पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१३३) ज्योतिषसिद्धांतग्रंथांत चैत्रांत वर्षारंभ आहे, याचे कारण त्या ग्रंथांच्या पूर्वी जी पद्धति प्रचारांत होती ती त्यांस घेणे भाग पडले असावें हे उघड आहे. महाभारतांत दोन ठिकाणी मास मार्गशीर्षादि आहेत हे मागे सांगितलेंच (पृ. १११). गिजनीच्या महमुदाबरोबर अल बीरुणी म्हणून प्रवासी आला होता त्याने लिहिले आहे की सिंध वगैरे प्रांतांत मार्गशीर्षांत वर्षारंभ होतो.* यावरून कांहीं प्रांतांत कांहीं काल मार्गशीर्षांत वर्षारंभ होत असे हे निर्विवाद आहे. तर याविषयी विचार करूं. कृत्तिकादि गणना शकापूर्वी सुमारे ३००० वर्षे या काली प्रचारांत आली. त्यानंतर मार्गशीर्ष हा पहिला मास कांहीं प्रांतांत मानूं लागले असें दिसून येते. मृगनक्षत्रास आग्रहायणी असें नांव आहे. त्याचा अर्थ जिच्या (ज्या नक्षत्राच्या रात्रीच्या) अग्रभागी हायन म्हणजे वर्ष आहे ती असा होय. 'पूर्वफल्गुनी ही संवत्सराची शेवटची रात्र, उत्तरफल्गुनी ही पहिली रात्र अशी वाक्ये वेदांत आहेत त्याप्रमाणेच हे होय. वेदकालीं महिने चांद्र होते; तेव्हां वर्षारंभ चांद्रमासाच्या आरंभी होत असे हे उघड आहे. तेव्हां वरील वाक्यांतील पूर्वफल्गुनी हे चांद्रमासाचे शेवटचे नक्षत्र आणि उत्तरफल्गुनी हे पुढील मासाचें आरंभींचें नक्षत्र आहे हे उघड आहे. म्हणजे ही नक्षत्रे दिननक्षत्रे ( चंद्रासंबंधी) आहेत. मासाच्या अंती मृगशीर्ष नक्षत्री चंद्र असतां दुसरे दिवशीं वर्ष सुरू करण्याची पद्धति होती, आणि त्याकरितां त्या नक्षत्रास आग्रहायणी नांव पडले असले पाहिजे. मृगशीर्ष हे पहिले नक्षत्र असतां ही पद्धति असावी; त्याप्रमाणेच कृत्तिका हे पहिले नक्षत्र झाले तेव्हां कृत्तिका नक्षत्री चंद्र असेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी मार्गशीर्षांत वर्षारंभ करण्याची पद्धति प्रचारांत आली असे दिसते. आणि अर्थात हा मास पूर्णिमान्त मानाचा होय. कृत्तिका नक्षत्री चंद्र पूर्ण झाला ह्मणजे त्याच्या दुसन्या दिवशीं जो पूर्णिमान्त सुरू होतो त्यास सांप्रत मार्गशीर्ष हेच नांव प्राप्त होते, त्याचप्रमाणे तेव्हाही होत असले पाहिजे. कृत्तिकायुक्त पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वरिंभ होई त्याप्रमाणे त्यापूर्वी मृगशीर्षयुक्त पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वर्षारंभ होत असावा हे सहज दिसते. यास सरूद्दर्शनी एक अडचण दिसते. त्या दिवशीं जो मास सुरू होईल त्यास सांप्रतच्या पद्धतीने पौष हे नांव येते आणि पौषांत वर्षारंभ असा दाखला तर कोठेही नाही. परंतु हे ठीकच आहे. कृत्तिकांपूर्वी मृगशीर्ष हे पहिले नक्षत्र असण्याचे कारण त्यांत वसंतसंपात असणे यावांचून दुसरे काही दिसत नाही. आणि मार्गशीर्षांत वसंतसंपात शकापूर्वी सुमारे ४००० वर्षे या काली होता. तेव्हां नक्षत्रप्रयुक्त माससंज्ञा प्रचारांत आल्या नव्हत्या. यामुळे नक्षास मात्र आग्रहायण अथवा आग्रहायणी अशी संज्ञा प्राप्त झाली आणि पौषांत वर्षारंभाचा दाखला नाही हे ठीकच आहे. कृतिकायुक्त पूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीं जो मास सुरू होईल तो कार्तिक, मृगशीर्षयुक्त पूर्णिमेच्या दुसया दिवशी जो सुरू हाईल तो मार्गशीर्ष, अशी पद्धति कदाचित् असेल, असें

  • Biruni, India Vol. II. p. 8. हिी (तै. ना. १. १.२.) वाक्ये पुढे दिली आहेत. (पृ. १३५ पहा.)