पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तीन स्कंध मानलेले आहेत. पहिल्यास गणित, दुसन्यास संहिता, आणि तिसन्यास होरा किंवा जातक ह्मणतात. गणितास सिद्धांत असेंही ह्मणतात. नारद ह्मणतोः - सिद्धांतसंहिताहोरारूपं स्कंधत्रयात्मकं । वेदस्य निर्मलं चक्षुज्योतिःशास्त्रमनुत्तमं ॥ नारदसंहिता. १.४. श्रीपति कृत रत्नमालेचा टीकाकार महादेव (शके ११८५) ह्मणतोःग्रहगणितपाटीगणितबीजगणितरूपमनिश्चलमूलस्य बहुविधविततहोरातंत्रशाखस्य ज्योतिःशानवनस्पतेः संहितार्था एव फलानीत्यवधार्य, जातकर्मनामकरणमौजीबंधनविवाहयात्रादौ निखिलसंहितार्थमल्पग्रंथेनाभिधातुमिच्छ:...आह ॥ केशवरूत मुहूर्ततत्वनामक ग्रंथाच्या टीकेंत (सुमारे शके १४४० ) गणेशदेवज्ञ ह्मणतोः श्रीकेश वो... गणितस्कंध...जातकस्कंधचोकबा...संहितास्कंधं चिकीर्षः...प्रतिजानीते. आकाशांतील ज्योतींच्या विचाराकडे आमच्या लोकांचे लक्ष्य फार प्राचीन काळापासून लागले होते. तथापि कोणत्याही विषयाचे शास्त्र वनण्यास पुष्कळ काळ लोटला पाहिजे. त्याप्रमाणेच ज्योतिःशास्त्राचे ग्रंथ होण्यास पुष्कळ काळ लोटला असेल. व प्रथमतः जे ग्रंथ झाले असतील त्यांत तरी ह्या शास्त्राचे विवेचन केवळ मळभूत कांही गोष्टींचें व तेंही स्थूलच असणार हे उघड आहे. आपल्या हल्ली उपलब्ध असलेल्या ज्योतिषग्रंथांत अतिप्राचीन ग्रंथ मटला ह्मणजे वेदांगज्योतिष होय. त्यांत केवळ सूर्यचंद्रांच्या स्थितीचा गणितसंबंधे विचार आहे. त्यानंतरचा ग्रंथ अथर्ववेदांग ज्योतिष हा असावा.* यांत वरील तीन स्कंधांपैकी दुसऱ्या व तिसन्या स्कंधांचा काहीसा विचार आहे. यानंतरचे ग्रंथ मटले झणजे गर्ग, पराशर इत्यादिकांच्या संहिता होत असे दिसते. ज्योतिःशास्त्राचे बरेच ज्ञान झाल्यावर त्याच्या गणितादिक तीन शाखा झाल्या असाव्या; परंतु त्यापी सर्व शाखांचें ज्यांत एकत्रच विवेचन आहे असे कांहीं ग्रंथ झाले असावे. असे ग्रंथ होते व त्यांस संहिता असेंच नांव देत असत असे दिसते. . वराहमिहिर आपल्या बृहत्संहितेंत ह्मणतोः ज्योति शास्त्रमनेकभेदविषयं स्कंधत्रयाधिष्ठितं ।। तत्कात्स्न्ोपनयस्य नाम मुनिभिः संकीर्त्यते संहिता ॥ अध्याय वेदांगज्योतिष आणि गर्गादिकांच्या संहिता ह्यांहून प्राचीन ग्रंथ होते की काय हे समजण्यास काही साधन नाही. सांप्रत कांहीं उपलब्ध नाहीत. गर्गाडिकांच्या संहिता वगैरे जे ग्रंथ हल्ली उपलब्ध आहेत ते सर्व मूळचे जसेच्या तसेच आजपर्यंत राहिले आहेत की काय ह्याविषयी खात्रीने सांगणे कमी आहे. गर्गसंहिताही दोन तीन प्रकारच्या हल्ली उपलब्ध आहेत. तथापि वरील वराहमि.. हिराच्या वचनांत सांगितल्याप्रमाणे तिन्हीं स्कंधांचा एकत्र विचार ज्यांत आहे असे साथ प्रथम असलेच पाहिजेत हे उघड आहे. मग ता विचार पारी असो किंवा अंशतः असो. ज्योतिःशास्त्राचे ज्ञान जसजसे वाढत गल व मो शाखा

  • केवळ पुढील ग्रंथांचे स्वरूप थोडक्यांत दाखविण्याकारतां पुष्कळ गोष्टींचे दिग्दर्शन मात्र ज्य केले आहे. त्यांचा सविस्तर विचार यथास्थली होईलच.