पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १२३) म्हणजे शनि नव्हे, ग्रहांचे पुत्र काहीं धूमकेतु आहेत त्यांतला एक ध्यावा असे कसे तरी समाधान करितां येईल (६) 'वक्रानुवकं ' या श्लोकांत पावकप्रभ लोहितांग हा श्रवणावर वक्र झाला असें वर्णन आहे. याचा विचार लेले यांस करितां आला नाही. पावकप्रभ लोहितांग म्हणजे मंगळ नव्हे तर कोणी तरी धूमकेतु असें लेले यांस घ्यावे लागते. सारांश कांहीं ग्रहांची स्थिति दोहोंहून जास्त नक्षत्रांवर सांगितलेली आहे तिची गति सायन मानाने होत नाही. (७) 'मपास्वंगारको वकः श्रवणे च बृहस्पतिः' यांत दोन्ही नक्षत्रे कोणत्या तरी एकाच पद्धतीची असली पाहिजेत असें सहज दिसते. परंतु मघा हे सायन आणि श्रवण तारात्मक असें लेले यांस घ्यावे लागते. त्यांत चमत्कार हा की, मघा सायन असून त्या बहुवचनी आहेत. सायन नक्षत्रास बहुवचन कोठून आलें ? (८) शल्यवधाचे दिवशी प्रातःकालचे असें वर्णन आहे:भृगुसून धरापुत्रौ शशिजेन समन्वितौ ॥ १८॥ शल्यपर्व, अ. ११. ह्यांत शुक्र, मंगळ, आणि बुध एकत्र आहेत. याचा विचार लेले यांच्या गणितांत मुळीच नाही. (९) 'कृत्वाचांगारको' या श्लोकांत मंगळ ज्येष्ठांवर वक होऊन अनुराधांची प्रार्थना करीत आहे असे म्हटले आहे. यांत विलोमगति स्पष्ट दिसते. लेले यांच्या गणितांत मंगळवक येत नाही, म्हणून वक्र शब्दाचा अर्थ त्यांस निराळा करावा लागला. (१०) लेले यांणी घेतलेले अयनांश घेऊन त्यांच्या सायनग्रहांवरून निरयननक्षत्रे काढली तर चंद्र पूर्वफल्गुनींत येतो ; भारतांत तो मघांजवळ आहे. मंगळ अनुराधांत येतो; भारतति तो ज्येष्ठांजवळ आहे असें लेले म्हणतात. भारतातल्या ग्रहस्थितींत निरयनविभागात्मक नक्षत्रे नाहीतच, तारांजवळ ग्रह सांगितले आहेत असें लेले म्हणतात. तसें म्हटले तर त्या त्या तारांची स्थिति लेले यांनी काढलेल्या काली कोठे होती है काढिले पाहिजे. अयनगति ५० विकला धरून शकापूर्वी ५३०६ या वर्षी तारांचे सायनभोग काढिले, तर पूर्वाभाद्रपदायोगताराभोग राश्यादि ८१३१५ येतो. शुक्र तिच्यामार्ग २२ अंश झणजे शतभिषक तारेच्याही मागें येतो. तर तो पूर्वाभाद्रपदांजवळ म्हणण कसे शोभेल ? ज्येष्ठाभोग ४।२९।२२ येतो. मंगळ तिच्या मागे २३ अंश ह्मणजे विशाखातारांजवळ येतो. तो ज्येष्ठांजवळ ह्मणणे कसें शोभेल! सपतिगति ५० विकलांहून कमजास्त असेल असे मानलें: तारांची निजगति हिशेबांत घेतली ; ग्रहस्थिति भोगावरून न सांगतां विषुवांशांवरून सांगत असत असे मानले; तरी या दोन ग्रहांची स्थिति भारतांतल्या वर्णनाशी जुळेल अशी येत नाहा. लेले यांनी घेतलेल्या कालाच्या मागचा पुढचा एकादा काल घेतला असता शेवटचे २।३ आक्षेप येणार नाहीत, अशी स्थिति कदाचित निघेल. तरी बाकीचे आक्षेप कायम राहतात. एकंदरीत भारतांतली ग्रहस्थिति सायननिरयन अशी दुहेरी नाही; आणि लेले यांनी आणलेला काल खरा नाही.*

  • यावरून सायनगणना मला मान्य नाही असे समजू नये. भारतांतली ग्रहास्थति सायन नाही इतकेच माझे म्हणणे आहे. भारताहून फार प्राचीन अशा वेदांस सायनगणना संमत आहे याविषयी सविस्तर विवेचन पुढे येईलच.