पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११७) मावास्येपूर्वी सातवे दिवशी परत येत असतां कर्ण कृष्णास ह्मणतोः-( उद्योगपर्व अध्याय १४३). प्राजापत्यं हि नक्षत्रं ग्रहस्तीक्ष्णो महाद्युतिः ॥ शनैश्चरः पीडयति पीडयन् प्राणिनोधिकं ॥८॥ त्वा चागारको वनां ज्येष्ठायां मधसदन ॥ अनराधां प्रार्थयते मैत्रं संगमयत्रिव ॥ ९॥ विशेषेण हि वाष्र्णेय चित्रां पीड़यते ग्रहः ॥ १० ॥ सोमस्य लक्ष्म व्यावृत्तं राहुरर्कमुपैति च ।। या स्थितीवरून फार दुश्चिन्हें दिसत आहेत, लोकसंहार होणार आहे असें दिसर्ते, असा कर्णाच्या बोलण्याचा उद्देश आहे. युद्धाच्या पूर्वी व्यास धृष्टराष्ट्रास ह्मणतो: भीष्मपर्व अध्याय ३. श्वेतो ग्रहस्तथा चित्रां समतिक्रम्य तिष्ठति ॥१२॥ धूमकेतर्महाघोरः पुष्यं चाक्रम्य तिष्ठति ।।१३।। मघास्वंगारको वक्रः श्रवणे च बृहस्पतिः ॥ भगं नक्षत्रमाक्रम्य सूर्यपुत्रेण पीड्यते ।। १५ ।। शुक्रः प्रोष्ठपदे पूर्वे समारुम विरोचते ॥ १५ ॥ रोहिणीं पीडयत्येवमुभौ च शशिभास्करौ ॥ चित्रास्वात्यंतरे चैव विष्टितः परुषः ग्रहः ॥ २० ॥ वक्रान वक्र कृत्वा च श्रवणं पावकप्रभः ॥ ब्रह्मराशिं समावृत्य लोहितांगो व्यवस्थितः॥१८॥ संवत्सरस्थायिनौ च ग्रहौ प्रज्वलितावुभौ ॥ विशाखायाः समीपस्थौ बृहस्पतिशनैश्चरौ ॥२०॥ ही सर्व चिन्हें लोकसंहारदर्शक आहेत असें व्यास सांगत आहे. वर व्यास आणि कर्ण यांच्या भाषणांत आलेली ग्रहस्थिति थेट पांडवांच्या वेग्रहज्ञान. ळची असली पाहिजे असे दाखविलेंच आहे, (पृ. १०८). त्यावरून पांडवांच्या कालीं ग्रहांचे ज्ञान होते, आणि ग्रहस्थिति नक्षत्रांस अनुसरून सांगत असत, असे सिद्ध होते. मग पांडवांचा काल कोणताही असो. प्रसंगोपात्त पांडवांच्या कालाचा विचार करूं. द्वापर आणि कलि यांच्या संधीस पांडव झाले अशी कांहीं वाक्ये भारतांत पांडवांचा काल. आढळतात. अंतरे चैव संप्राते कलिद्वापरयोरभूत् ।। स्यमंतपंचके युद्धं कुरुपांडवसेनयोः ॥ १३ ।। आदिपर्व, अध्याय २. तसेंच पतत्कलियुगं नाम अचिरायत्प्रवर्तते ।। ३८॥ वनपर्व, अ. १४९. हें मारुतीचें भीमास बोलणे आहे. तसेंच वनपर्वाच्या १८८ व्या अध्यायांत युगमाने सांगितली आहेत, त्यांत कलियुगांत अमुक होईल असें भविष्यरूपार्ने पुष्कळ वर्णन आहे. अस्मिन् कलियुगे त्वस्ति पुनः कौतूहलं मम ॥ यदा सूर्यश चंद्रश्च तथा तिष्य बृहस्पती ॥१०॥ एकराशौ समेष्यांत प्रपत्स्याति तदा कृतं ॥११॥ वनपर्व, अ. १९०. हे वनवासांत असतां धर्माचे बोलणे आहे. प्राप्तं कलियुगं विद्धि प्रतिज्ञां पांडवस्य च ।। आनृण्यं यात वैरस्य प्रतिज्ञायाश्च पांडवः ॥२३॥ गदापर्व, अ. ३१.