पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमुक वेळी ग्रहण झाले असेही उल्लेख कथाप्रसंगाने पुष्कळ आहेत. पांडव वनवासास निघाले तेव्हां सूर्यग्रहण झाले होते.राहुरग्रसदादित्यमपर्वणिविशांपते ॥ १९॥ सभाप. अ. ७९. कौरवपांडवांच्या युद्धाच्या पूर्वी धृतराष्ट्रास उपदेश करण्यास व्यास आला होता. त्याच्या बोलण्यांत पुढील वाक्ये आहेतः अलक्ष्यः प्रभया हीनः पौर्णमासींच कार्तिकीं ॥ चंद्रोभूदग्निवर्णश्च पद्मवणे नभस्तले ॥ भीष्मप. अ. २. चतुर्दशी पंचदशी भूतपूर्वा तु षोडशीं ॥ इमां तु नाभिजानेहममावास्यां त्रयोदशीं ॥ चंद्रसूर्यावुभौ ग्रस्तावेकमासी त्रयोदशी ।। ३२ ।। भीष्मप. अ. ३. यावरून आणि पूर्वापर संदर्भावरून दिसते की युद्धापूर्वी कार्तिकी पौर्णिमेस चंद्रग्रहण पडले होते, आणि पुढील अमावास्येस सूर्यग्रहण पडले होते. एका महिन्यांत दोन ग्रहणे होतात, परंतु एकाच स्थली ती दिसण्याचा संभव फार थोडा. ह्मणून ज्योतिषसंहिताग्रंथांत हा मोठा उत्पात मानिला आहे. आणि यासंबंधे भटोत्पलरुत बृ. सं. टीकेंत (शके ८८८) या भारतवचनांतील ग्रहणांचा विचार केला आहे. (बृ. सं. राहुचार) वरील वाक्यांत १३ दिवसांचा पक्ष आला आहे. तेरा दिवसांचा पंध्रवडा फार क्वचित् होतो; आणि तोही उत्पातासारखाच मानितात. त्यास विश्वघनपक्ष. क्षयपक्ष मणतात. सूर्यसिद्धांतादि गणितग्रंथांवरून चंद्रसूयाच्या स्पष्ट स्थितीचे गणित करून तिथि काढल्या ह्मणजे १३ दिवसांचा • पंध्रवडा येतो. परंतु वेदांगज्योतिषांतील मध्यम मानाने किंवा कोणत्याही सूक्ष्म मध्यम मानानें १३ दिवसांचा पंध्रवडा कधीच यावयाचा नाही. कारण वेदांगज्योतिषाप्रमाणे अर्धचांद्रमासाचें मान १४ दिवस ४५ घटका २९॥ पले आहे. आणि सूर्यसिद्धांतादिकांप्रमाणे आणि युरोपिअन सूक्ष्ममानानेही अर्धचांद्रमासाचें (पंध्रवड्याचें ) मध्यममान १४ दि. ४५ घ. ५५. प. आहे. पध्रवड्याचे मान जेव्हां १४ दिवसांहून कांहीं कमी असेल तेव्हां मात्र १३ दिवसाचा पंध्रवडा येण्याचा संभव आहे. ते मध्यम मानाने कधीच येत नाही. स्पष्ट मानाने मात्र येते. उदाहरणार्थ, शके १७९३ फाल्गुन कृष्णपक्ष १३ दिवसांचा होता. शके १८०० ज्येष्ठ शुक्लपक्ष १३ दिवसांचा होता. आणि त्या दोन्ही वेळी ग्रहलाघवा पंचांगाप्रमाणे आणि इंग्लिश नाटिकल आल्मनाकवरून केलेल्या सूक्ष्म केरोपंती पंचांगाप्रमाणेही पंध्रवडा १४ दिवसांहून कांहीं घटिका कमी होता. अर्धमासाचे मान १४ दिवसांहून कमी थोडेच वेळा असते. आणि त्या सर्व वेळी १३ दिवसांचा पंध्रवडा होतो असें नाहीं. उदाहरण, एका मेषमहिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा एखाद्या इंग्रजी महिन्याच्या पहिल्या तारखेस सूर्योदयानंतर ४ घटिकांनी अमावास्या किंवा पूर्णिमा संपली; स्पष्टतिथिमानाने अर्धमास १३ दिवस ५५ घटिका आहे असें समजू. तर मेषमासाच्या १४ व्या दिवशी सूर्योदयानंतर ५९ घटिकांनी पुढील पूर्णिमा किंवा अमावास्या संपेल. मेषाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर पर्वत