पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतील. काही भाग निरनिराळ्या काळचे आहेत, असें ज्योतिषप्रमाणावरूनही दिसून येते. तथापि प्रक्षिप्त भागासंबंधे एक महत्वाचा शोध एथे सांगितला पाहिजे. महाभारत ग्रंथ एक लक्ष आहे ही समजूत आजची आहे असे नाही. हिंदुस्थानसरकारच्या हुकुमानें Inscriptionnm Indicarum नांवाच्या पुस्तकमालेत प्राचीन शिलालेख, ताम्रपट इत्यादि छापत आहेत. त्यांत तिसऱ्या पुस्तकांत गुप्तराजांचे लेख आहेत. त्यांत उच्चकल्प येथील महाराज सर्वनाथ याचा संवत् १९७ चा लेख आहे. (सदई पुस्तकाचें पृ. १३४ पहा.) त्यांत व्यासलत महाभारत एक लक्ष असा स्पष्ट उल्लेख आहे. यांतील संवत् हा चेदि (कल चारि ) संवत् आहे असा सांप्रत निर्विवाद निर्णय झाला आहे. ( Indian Antiquary, III. 227 f; XVII 215 पहा). चेदि संवत् १९७ झणजे (१९७ + १७० = ) शके ३६७ ह्मणजे इ. स. ४४५ होतात. [ सदहूं पहा.] यावरून शककालाच्या चवथ्या शतकानंतर महाभारतांत कांहीं नवीन शिरलें नाहीं असें ह्मणण्यास हरकत नाहीं; आणि भारताचे काही भाग तर पांडवांच्या काळचे आहेत, असे मला वाटते; मग पांडवांचा काल कोणताही असो. उपाख्याने, युद्धादिकांची लांबलचक वर्णने, असे प्रकार मागाहून शिरण्याचा संभव आहे. परंतु पांडवांची मूळ गोष्ट आणि युद्धाच्या वेळी ग्रह अमुक अमुक नक्षत्रांजवळ होते, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी मागाहून कोणी स्वकपोलकल्पित घालील असा फारसा संभव नाही. ज्योतिषसंबंधे जी वाक्ये हल्ली भारतांत आढळतात त्यांविषयी असेंही ह्मणतां येईल की, ती सांप्रतच्याच रूपाने पांडवांपासून असतील असें नाही. दंतकथा चालत आलेल्या घेऊन कोणी मागाहून त्या ग्रंथनिबद्ध केल्या असतील. सारांश, मी ह्मणतों की ज्योतिषसंबंधे ज्या गोष्टी भारतांत आढळतात त्यांतील फार महत्वाच्या अशा काही तरी गोष्टी थेट पांडवांपासून चालत आल्या आहेत. आणि दुसन्या काही तितक्या प्राचीन नसल्या तरी आश्वलायन, पाणिनि इत्यादिकांइतक्या प्राचीन आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की सर्व भारत मी स्वतः ज्योतिषदृष्टीने वाचलें आहे. त्यांत मला सात वार आणि मेषादि राशि कोठे आढळल्या नाहीत. यावरून निःसंशय *ह्मणतां येते की भारतांत ज्योतिषसंबंधे ज्या गोष्टी आहेत त्या वा

  • एक चमत्कार एथें सांगितला पाहिजे. निर्णयामृत म्हणून धर्मशास्त्राचा एक प्रसिद्ध ग्रं आहे. त्यांत महाभारतांतलीं ह्मणून पुढील वाक्ये चातुर्मास्यसंबंधं दिली आहेतः। वार्षिकांश्चतुरोमासान् व्रतं किंचित्समाचरेत् ॥ असंभवे तुलार्के तु कन्यायां तु विशेषतः ।।

परंतु हा श्लोक मला भारतांत कोठे आढळला नाही. घटिकापात्राविषयी काही वाक्ये भार तांतील ह्मणन निर्णयामतांत एके ठिकाणी दिली आहेत तीही 'मला भारतांत कोठे आढलत नाहीत. तसेंच निर्णयसिंधूंत द्वितीय परिच्छेदांत महालयप्रकरणी पुढील वचन भारतांतले छ णून दिले आहे: यावच कन्यातुलयोः क्रमादास्ते दिवाकरः ॥ शून्यं प्रेतपुरं तावद् वृश्चिकं यावदागतः ॥ परंतु भारतांत हे वचन मला कोठे आढळले नाही. गणपत कृष्णाजीच्या छापखान्यांत छापलेले पुस्तक वाचून मी हे लिहिब वामन शास्त्री इसलामपुरकर यांस सदई छापील भारतांत नाहीत अशी का आहेत अमें त्यांनी प्रसिद्ध केले आहे.