पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इतर ग्रंथांतील युगपद्धतीशी सर्वांशी मिळतो. ही किंवा ह्यासारखी युगपद्धति ज्या ज्या ग्रंथांत आढळते त्या सर्वांत निरुक्त प्राचीन आहे, हे सांगण्यास नकोच. यांत युग म्हणजे अमुक वर्षांचे हे सांगितले नाही, तरी तें पांच वर्षांचे नव्हे, तर काही तरी दीव कालाचे आहे, असें वाक्यांच्या एकंदर हेतूवरून स्पष्ट आहे. ४. पाणिनीय व्याकरण. यांत संवत्सर या अर्थी वेदांत कचित् आलेल्या वर्ष (५.१.८८;७.३.१६) आणि हायन (४.१.२७, ५. १. १३० ) ह्या संज्ञा आल्या आहेत. नक्षत्रप्रयुक्तमाससंज्ञा चैत्रादि आल्या आहेत (४. २.२१). दिवस विभागांपैकी मुहूर्त शब्द आला आहे (३. ३.९). तसेंच शरीरांतल्या नाडीखेरीज इतर एक किंवा अधिक अर्थाचा नाडीशब्द आहे (५. ४. १५९ ), यावरून कालवाचक नाडीशब्द असेल असें दिसते. तिथि शब्द आला नाही; परंतु तो पाणिनीच्या वेळी नसेलच असें ह्मणवत नाही. पाणिनीय व्याकरण हा ज्योतिषविषयक ग्रंथ नव्हे किंवा अमुक नक्षबावर अमुक कर्मे करावी असे विधान करणारा धर्मशास्त्रग्रंथ नव्हे; म्हणून त्यांत जे ज्योतिषविषयक पारिभाषिक शब्द नाहींत ते पाणिनीच्या वेळी नसतीलच असें म्हणतां येणार नाही. कृतादि युगसंज्ञापैकी कलि शब्द मात्र पाणिनीयांत आला आहे (४. २.८); आणि तोही युगसंबंधों नाही; परंतु एवढ्यावरून कृतादि युगसंज्ञा पाणिनीच्या वेळी नव्हत्या असे सिद्ध होणार नाही. नक्षत्रे आली आहेत, त्यांत “तिष्य " या अर्थी " पुष्य " आणि "सिध्य" हे शब्द आले आहेत (३१.११६). " श्रोणा" या अर्थी अथर्ववेदांत मात्र आलेला “श्रवण " शब्द आला आहे (४. २. २३). छंदसि पुनर्वस्वोरेकवचनं (१.२.६१), विशाखयोश्च (१.२.६२), असे म्हटले आहे; परंतु श्रुतींन पुनर्वसु आणि विशाखा हे शब्द मला एकवचनी कोठेच आढळले नाहीत. मग मी न वाचलेल्या कोणत्या वेदांत आले असतील ते असोत. प्रोष्ठपदा शब्द द्विवचनी आणि बहुवचनी सांगितला आहे ( १. २. ६०). विभाषाग्रहः (३.१ १४३) या सूत्रावरून तारारूप ग्रहवाचक ग्रह शब्द पाणिनीच्या वेळी असावा असें अनुमान करण्यास हरकत नाही. प्रकरण दुसरें. स्मृति, महाभारत, इत्यादि. स्मृति. मनुस्मृतींत पहिल्या अध्यायांत युगपद्धति वर्णिली आहे. पुराणे, ज्योतिषग्रंथ इत्यादि इतर ग्रंथांत बहुधा हीच युगपद्धति आहे, म्हणून ती युगपद्धति. सर्व एथे एकदा देतो. ब्राह्मस्य तु क्षपाहस्य यत् प्रमाणं समासतः ॥ एकैकशो युगानां तु नामशस्तन्निबोधत ।। ६८ ।। चत्वार्याहुः सहस्राणि वर्षाणां तत्कृतं युगं ।। तस्य तावच्छती संध्या संध्यांशश्च तथाविधः॥६॥ इतरेषु ससंध्येषु ससंध्यांशेषु च त्रिषु ॥ एकापायेन वर्तन्ते सहस्राणि शतानि च ॥ ७०॥ यदेत परिसंख्यातमादा वेव चतुर्युगं ॥ एतद् द्वादशसाहस्रं देवानां यगमुच्यते ॥ ७१ ॥