पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१००) urav १५ २४साधक २५ नेधन १७ २६ मैत्र (९) १८ २७ परममैत्र एकेका वर्गांत तीन तीन नक्षत्रे आहेत. आणि ती नवानवांच्या अंतराने आहेत. ही सर्व जन्मनक्षत्रापासून मोजावयाची हे १०४ श्लोकावरून स्पष्ट आहे. पुढे या नक्षत्रांवर अमुक कर्मे करावी किंवा करूं नये हा प्रकार आहे. आणि पुढे ग्रहोल्काशनिनिर्घातैः कंपैदीहैश्च पीड्यते ॥ यद्यद्भयं भवति तत् तत्प्रवक्ष्याम्यशेषतः ।। १२२ ।। ह्मणजे ग्रह, उल्का, विद्युत, इत्यादिकांनी नक्षत्रे पीडित झाली असतां जें भय प्राप्त होणार ते सांगतों असें ह्मणून सर्व वर्गीसंबंधी भयें इत्यादि उत्पात. सांगितली आहेत. यांतील ग्रह शब्दानें सूर्यादि ग्रहच इष्ट दिसतात पुढे गर्भधारणाविषयी काही सांगितले आहे शेवटी मटले आहे की आत्मज्योतिषमित्युनं स्वयमुन स्वयंभुवा ॥ तत्वतः पृच्छमानस्य काश्यपस्य महात्मनः ॥२६२॥ य इदं पठते विप्रो विधिवञ्च समाहितः ॥ यथोक्तं लभते सर्व माम्नायविधिदर्शनात ॥ १६२ ।। ग्रंथांत कोठेही हैं अथर्वज्योतिष असें झटले नाही. तथापि अथर्ववेदज्योतिष असें यास ह्मणतात, त्यास शेवटच्या श्लोकांतील “आम्नायविधिदर्शनात् " याचा आधार दिसतो. । ऋग्यजुर्वेदांगज्योतिषाइतके किंवा वेदाच्या इतर कोणत्याही अंगाइतके हे प्राचीन नाही, हे त्यांतील विषयांवरून उघड आहे. तथापि ह्या ज्योतिषकाराच्या वेळी मेषादि बारा राशि प्रचारांत असत्या, तर त्या यांत आल्यावांचून राहिल्या नसत्या. त्या यांत नाहीत यावरून हे पुष्कळ प्राचीन आहे, आणि यास अथर्ववेदज्योतिष असे ह्मणतात, ह्मणून त्याचा एथेच विचार केला यांत मेवादि राशि नमन वारांची नांवे आहेत ही एक महत्वाची लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. त्याविषयीं जास्त विचार पुढे करूं. मेषादि राशींच्यासंबंधानें जी जातकपद्धति या देशांत सुरू झाली तिच्याशी अगदी विसदृश नव्हे तर बरीच सदृश अशी जातकपद्धति यांत आहे; आणि ती अगदी स्वतंत्रपणे याच देशांत उत्पन्न झालेली आहे याविषयी संशय घेण्यास जागा नाहीं. यावरून मेषादि राशि हिंदूंनी परदेशांतून घेतल्या असल्या, तरी त्यापूर्वीच केवळ नक्षत्रसंबंधाने त्यांच्यांत असलेली जातकपद्धति पुढे त्याच नमुन्यावर त्यांनीच वि. स्तृत केली असेल असें संभवनीय दिसते. २. कल्पम् ने. आश्वलायनसूत्रांत " श्रावण्यां पौर्णमास्यां श्रवणाकर्म" (गृह्यसूत्र २.१.१.) इत्यादि वाक्यांत नक्षत्रप्रयुक्त माससंज्ञा आल्या आहेत आश्वलायनसूत्र. मधुमाधव हीं मासनामें आहेतच (श्रौतसूत्र ४. १२). एक ठिकाणी ऋतूंचा संबंध आला आहे. (श्री. सू. ४. १२), त्यांत वसंतापासून आरंभ आहे. तिथि शब्द आला नाही तरी “ मार्गशीर्ष्या प्रत्यवरोहणं चन