पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राविषयी ऋग्वेदादिकांत पुष्कळ ठिकाणी वर्णन आहे. रात्रीच्या वेळी सूर्य आपले तेज अग्नीच्या ठिकाणी स्थापित करितो अशी वर्णनेही पुष्कळ आहेत. अभिवावादित्य : सायंप्रविशति ॥ तस्मादगिरान्नक्तं ददृशे ॥ तैत्ति: ब्राह्मण २. १. २. ८. यांत रात्री सूर्य अग्नीमध्ये प्रवेश करितो असें झटले आहे. जसें सूर्याकडे तसेच किंबहुना जास्तच लक्ष्य मनुष्याचे चंद्राकडे लागले असावें. सूर्याप्रमाणे तो रात्रीस नियमानें उगवत नाहीं. कधीं सूर्यास्ताबरोबर उगवतो व तेव्हां तो पूर्ण दिसत असतो. उत्तरोत्तर मागाहून मागाहून उगवतो व लहान लहान दिखू लागतो. तारांतून त्याचे स्थान फार जलद पालटते. तो सूर्याच्या जवळ जवळ येऊ लागतो. पुढे एक दिवस तर तो मुळीच दिसत नाही. आणि पुढे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सूर्याच्या दुसन्या बाजूस सूर्यास्तानंतर लागलान पश्चिमेस दिसु लागतो. परंतु त्या वेळेस त्याची लहानशी कोर मात्र दिसते; जणूं काय तो नवीनच झाला आहे. ह्या दिवशीं सांप्रतही नवो नवो भवति जायमानोहां केतुरुषसामेत्यये ॥ भागं देवेभ्यो विधात्यायन्यचंद्रमास्तिरति दीर्घमायुः ।। क. सं. १०.८५. १९. हा बहुधा चारही वेदांत आढळणारा मंत्र ह्मणून मोठ्या उल्हासाने चंद्राचे दर्शन घेऊन त्यास वंदन करून व त्यास वस्त्राची दशी अर्पण करून तो आपल्यास नवीन वस्त्र व दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना लोक करितात हे प्रसिद्धच आहे. पुढें तो चंद्र वाढत वाढत जाऊन पुनः एके दिवशी पहिल्याप्रमाणे पूर्ण होतो. चंद्राच्या ह्या कमजास्त होण्याविषयीं ह्मणजे कलांच्या क्षयवृद्धीविषयी आपल्या प्राचीन व अर्वाचीन ग्रंथांत पुष्कळ वर्णन आहे. फार काय, चंद्राच्या कला, त्याच्यावरील काळा डाग, त्याचे सौम्य दर्शन व आल्हादकारक चंद्रिका इत्यादि गोष्टी सर्वकाळ व सर्व देशांत कविकल्पनासृष्टीच्या प्रधान विषयांपैकी एक. विषयच होऊन राहिला आहे. चंद्र एकदा पूर्ण झाल्यापासून पुनः सुमारे २९।३० दिवसांनी पूर्ण होतो, व इतक्याच काळाने तो पुढे पुनः पुनः पूर्ण होतो. एकदा सूर्य उगवल्यापासून पुनः उगवेपयंत बहुधा सारखाच वेळ नेहमी जातो असें मनुप्यास दिसून आल्यावर ति- . तका काळ, मणजे एक दिवस किंवा अहोरात्र, हे मनुष्याचें कालगणनेचे स्वाभाविक परिमाण झाले असले पाहिजे. तसेंच चंद्राविषयीं वरील नियम दिसनाल्यावर, तो एकदा पूर्ण झाल्यापासून पुनः पूर्ण होईसयंतचा काल हें मनुष्याचें काला णनेचे दुसरें-दिवसाहूनं मोठे-स्वाभाविक परिमाण ठरले असले पाहिजे. चंद्रासन तेच ह्या कालास दिलेले पुष्कळ भाषांत आढळतें. वेदांत चंद्रास मास में आढळते. उदाहरणार्थ ऋग्वेदांतील सूर्यामाप्सा मिथ उच्चरातः । क्र. सं. १०.६८.१०. सूर्यामासा विचरंता दिवि । क. सं. 10. ९३. १२. स्या ऋचा पहा. हे चंद्राचे मास हे नांव पूर्वोक्तकालास आहे हे प्रसिद्धना दिवस आणि मास हीं माने ठरल्यावर पुढे मनुष्यास असे दिसून आले की पावसाळा, हिवाळा, उन्हाळा हे पुनः पुनः येतात, ते काही नियमित