पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • पाठ श्लोक ७, १७, २२ तसेंच १४, १६, १८ आणि यजुभाठ श्लोक ३७ हे अंकगणित.

पाहिले असतां दिसून येईल. तसेंच अपवर्त ( संक्षेप ) करणे इत्यादि ज्या युक्ति योजल्या आहेत त्यांवरून अंकगणितावर चौगले परिश्रम झाले होते असे दिसते. मपाठ श्लोक १९ यांत "श्रविष्ठाभ्यां गुणाभ्यस्तान प्राविठमान् विनिर्दशेत् " असें आहे. इतर ज्योतिषग्रंथांत कोणत्याही वेळी क्षितिजाशी ला. लागलेल्या (प्राग्विलग्न ) क्रांतिवृत्ताच्या भागास लग्न ह्मणतात. अशाच प्रकारचा कांहीं अर्थ या श्लोकांत असेल तर तो फार महत्वाचा होय. यांत मेवादि राशि नाहीत व क्रांतिवृनाचे १२ विभाग करून तदनुसार ग्रहस्थिति मेषादि राशि. सांगण्याची पद्धति नाही. सूर्यचंद्रांची स्थिति नक्षत्र या वि. भागास अनुसरून सांगितली आहे. मेवादि राशि नाहीत तरी सौरमास आहेत. सूर्यमास असा शब्द प्रत्यक्ष आला सौरमास. आहे; चांद्रमास आणि सौरमास यांचा संबंध अनेक स्थली स्पष्ट सांगितला आहे; ४॥ सूर्यनक्षत्रांचा ह्मणजे २ सौरमासांचा ऋतु सांगितला असून त्या प्रत्येक ऋतूचा आरंभ चांद्रमासाच्या कोणत्या तिथीस होतो हे सांगितले आहे; व सूर्यसिद्धांतादि ग्रंथांत चांद्र आणि सौर या मासांच्या संबंधे अधिमासशेष काढण्याची रीति असते तशा प्रकारची यांत आहे ( पाठ श्लो. २३). सौरमासांची स्वतंत्र नांवें नाहींत. यावरून चैत्रादि संज्ञाच त्यांसही लावीत असतील. सांप्रत बंगाल्यांत मास सौर आहेत तरी त्यांची नांवें चैत्र इत्यादिच आहेत. पर्वगग. सूर्यसिद्धांतादि ग्रंथांत अहर्गण असतो तसा यांत पर्वगण करण्याची रीति आहे. आणखी याहून महत्वाची अशी एक गोष्ट सांगून हे प्रकरण पुरें करूं ती गोष्ट ही की जे कालविभाग तेच क्षेत्रविभाग, या पद्धतीची कालविभाग तेच क्षे स्थापना वेदांगज्योतिष झाले त्या काळी झाली होती. सूर्यविभाग. सिद्धांतादि ज्योतिषग्रंथांत कालविभाग आणि क्षेत्रविभाग ( वतुलाचे विभाग) यांचे साम्य असें आहे: ६० पळे घटिका ६. विकला कला ६० घटिका-दिवस ६० कला =अंश ३० दिवस-मास ३० अंश राशि १२ मास वर्ष १२ राशि =वर्तुळपरिघ किंवा ३६० दिवस =वर्ष. ३६० अंश =वर्तुळपरिघ. यांत कालविभाग आणि क्षेत्रविभाग एकाच पद्धतीवर किंबहुना एकच आहेत. याचप्रमाणे वेदांगज्योतिषांत नक्षत्राच्या कला ६१० आहेत; आणि दिवसांत त्यांपैकी चंद्र जितक्या चालतो तितक्या, ह्मणजे ६०३ कला दिवसाच्या मानल्या आहेत (कपाठ श्लोक १८ आणि २१ पहा.) दिवसाच्या कला ६०३ या गणितास गैर १३