पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणण्यास काही आधार नाही. वेद मणजे चार अशा प्रकारे संख्या सांगणे इत्यादि गोष्टींत वेदांगज्योतिषाची भाषा इतर ज्योतिषग्रंथांहून पुष्कळ भिन्न आहे. प्रो. वे. बर ह्मणतो की, वेदांगज्योतिषांत नक्षत्रांची नांवें अर्वाचीन ग्रंथांतली आहेत आणि त्यांत मेषादि राशि सुद्धा आहेत. 'राशि' हा शब्द ज्या श्लोकांत आला आहे त्याचा अर्थ वर मी लिहिलाच आहे. वेदांगज्योतिषांत मेवादि राशींची नांवें नर नाहीतच; परंतु नक्षत्रांची नांवें सुद्धा अर्वाचीन नाहींत. नक्षत्रापैकी स्पष्टपणे कापाठांत "अविष्ठा" मात्र आले आहे. ते अर्वाचीन ग्रंथांतलें "धनिष्ठा" असे नाही. यजुःपाठांत श्लोक ३६ यांत नक्षत्रांची ९ नांवे आहेत, त्यांत अश्वयुकू हे प्राचीन आहे, अश्विनी असें नाहीं. बाकी प्राचीन अर्वाचीन सारखीच आहेत. पाठ श्लोक १४ यांत खुणांनी नक्षत्रे सांगितली आहेत. त्यांत प्राचीन अर्वाचीन असा भेद ओळखितां येईल अशी अश्वयुक्, शतभिषक् ही आहेत; ती प्राचीन आहेत. श्रवण असें एक आहे, तें तैत्तिरीयब्राह्मणाप्रमाणे “ओणा" असें नाहीं; परंतु श्रवण ही संज्ञा अथर्वसंहिताकाली होती (पृ. ५४ पहा) आणि पाणिनीच्या वेळीही होती (पाणिनी ४.२.५, ४.२.२३ पहा.) तेव्हां वेबरचें ह्मणणे मुळीच विचारार्ह नाही. तेव्हां एकंदर विचार पहातां गणिताने वेदांगज्योतिषाचा जो काल निघतो त्याच कालचें तें असले पाहिजे. आतां वेदांगज्योतिषांत दिनमान दिले आहे, त्यावरून ते होण्याच्या स्थलाचा स्थल. विचार करूं. ऋपाठ श्लोक ७,२२ यांवरून निघतें की दिनमानाची रोजची वृद्धि नाडी येते; आणि अयनांती दिनमान २४ किंवा ३६ घटिका येते. ह्मणजे दिनार्थ १२ किंवा १८ घटिका आणि चरसंस्कार ३ घटिका झाला. हा रवीच्या परमक्रांतीच्या वेळचा झाला. रविपरमकांति इ०स० पूर्वी १४०० च्या सुमारास २३ अंश ५३ कला* होती. आमच्या ज्योतिषग्रंथांत ती २४ अंश धरितात. दोनही धरून स्थलाचे अक्षांश काढूं. त्याची रीति अशीः चरभुजज्या x क्रांतिकोस्पर्शरेषा = अक्षांशस्पर्शरेषा. चर ३ वटी = १८ अंश १० भुजज्या लायथं ९.४८९९८२ ९.४८९९८२ २४ कोस्पर्शरे. ला. १०.३५१४१७ १ ०.३५३८०१.२३।५३ कोस्प. ३४।४५.८ स्प. रे. ९.८४१३९९ ३४।५४.६स्प.रे.=९.८४३७८३ यावरून अक्षांश ३४।४६ किंवा ३४।५५ या स्थलाच्या सुमारास वेदांगज्योतिषांतलें दिनमान होते. दिनमानाची रोजची वृद्धि सांगितली आहे. ही रोज दि नमान सारखें वाढते असे समजून आहे; परंतु वस्तुतः तसे होत नाही. अयनसंधीस दिनमान फार थोडे वाढते, आणि विषुवसंधीच्या सुमारास फार वाढते. ३५ अक्षा शांवर अयनसंधीच्या वेळी दोन दिवसांत फार तर ही घटी वाढेल आणि विषुव संधीच्या वेळी एका दिवसांत सुमारें है। घटी वाढेल. वेदांगज्योतिषांत युगारंभ उदगयनारंभी आहे आणि धनिष्ठारंभीही सांगितला आहे. यावरून अयनचलन त्या वेळी माहीत नव्हतें असं अयनचलन दिसते. * केरोपंती प. सा. को. पृ. ५५ पहा.