पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६६ ] 6 पण जरासंघ परत गेला तो केवळ दुप्पट जोराच्या तयारीनें परत येण्याकरितांच होय. परत गेलेल्या त्याच्या सैन्याची लाट अधिक पाण्यासकट दुप्पट जोरानें पुन्हां मथुरेच्या किनाऱ्यावर येऊन आदळणार होती. वेढा उठल्याने झालेली शांतता ही खरी शांतता नसून केवळ वादळापूर्वीची नितांत शांतता होती. मथुरेतील सर्व लोक ही गोष्ट जाणून होते व भावी संकटास तोंड देण्यासाठी त्यांनीही आपल्याकडून शक्य ती तयारी व बंदोबस्त चालविलाही होता. इतक्यांत लवकरच - पूर्वीच भाकित केल्याप्रमाणे जरासंधाच्या अफाट सेनेच्या खवळलेल्या सागराच्या लाटा मथुरेवर येऊन आदळल्याच. इतक्या मोठ्या प्रचंड सैन्याशीं टक्कर देणें यादवांच्या मगदु- राच्या बाहेरची गोष्ट होती. रामकृष्णांचा अद्भुत पराक्रम इतक्यासही पुरुन उरला असता; परंतु आपल्यासाठी मथुरेतील लोकांस अधिक त्रास नको म्हणून यादव- सभेतील एका वृद्ध मंत्र्याच्या सल्ल्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब मथुरा त्याच दिवशीं सोडली व दक्षिणापथानें मार्ग आक्रमीत वेणानदीच्या कांठच्या करवीर- ग्रामीं परशुरामाची—तेजःपुंजकाय व दुष्टक्षत्रिय निर्दालक अशा भार्गवरामाची-गांठ घेऊन त्यांच्या सल्यानें खट्वांगनदीचा धबधबा पाहून शेवटीं कौंचपुरावरून गोमतपर्वतावर ते येऊन राहिले ! इकडे 'पक्षी ' याप्रमाणे ' पळाले ' असे जरास- धादि फांसेपारध्यांस कळल्याबरोबर त्यांनी आपल्या अफाट व अथांग सेनेचें- चतुरंगदलाचें-जाळें गुंडाळले व कृष्णबलराम जिकडे पळाले होते तिकडे जाऊन पुन्हां त्यांनी आपले जाळे पसरले. त्यांच्यांतच शिशुपाल होता. महाभारतांत राजसूय यज्ञाचे वेळीं ह्या दुष्ट आतेभावाचे शंभर अपराध पुरे भरल्यावर श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्रानें त्याचें मस्तक कसें धडापासून वेगळे केले ते आपण वाचलेच आहे. पण ती कथा पुढची आहे. सध्या आमच्या शिशुपालाचें अपराधांचें माप चालू होतें. ह्या दुष्टानें म्हटल्याप्रमाणें व परशुरामान सांगितल्याप्रमाणे जरासंधाच्या सैन्यांतील राजे खरोखरच 'नाजुक' होते. डोंगरीरी लढाया त्यांना ठाऊक नव्हत्या. तेव्हां शिशुपालाच्या साह्यानें त्या गोमंत पर्वतास चारी बाजूंनीं आग लावण्यांत आली. दोन दिवस जळणाऱ्या त्या वणव्यांत हजारों गरीब व हिंसक जीवांच संहार झाला. पण आमच्या कृष्णप्रभूस व बलरामदादांस त्याने काय होणार? ते ताबडतोब पर्वतावरून उडघा टाकून खाली आले व मग मात्र खवळलेल्या त्या दोन वीरांनी त्या लाखों सैनिकांस नुसते धुळीचे दिवे चारले. एकाच आचमनांत समुद्र गट्ट करणाऱ्या अगस्ती- प्रमाणें त्या दोघांच्या एकाकी पराक्रमांत हजारों योध्यांच्या आहुती पढत्या. उदया-