पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६३ ] " चौदा भुवने॑ वसती जयांचिये पोटीं । त्यासी आणी जेठी मारावया ॥ इंद्रादि सुर- वर जयाचे किंर । त्याशीं आणी पामर झोंबीसाठीं ॥ पण त्याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. मल्ल स मल भिडल्याबरोबर चाणुरासारख्या त्या बड्या धेंडाचे सुद्धां अठरा वर्षांच्या त्या पोरानी - कृष्णप्रभूनी क्षणार्धात् चूर्ण केले. तोंच कंसाज्ञेनें तोशल नांवाचा दुसरा प्रचंड मल्ल कृष्णाशी भिडला. इतक्यांत बळरामाने आखा- ज्याच्या दुसऱ्या भागांत मुष्टिकाला चांगलेच मुष्टिमोदक चारून त्यास यमसदनीं पाठविलें. तेव्हां कृष्णानेही मग वेळ न लावतां हां हां म्हणतां त्या पर्वतप्राय तोशलास बाढदिशी जमिनीवर आदळला व ठार केला. आपणास ठार मारण्यासाठी एकामागून एक प्रचंड शक्ती अंगावर फेंकणाऱ्या कंसाचा प्रभूस भयंकर राग आला. कृष्णबल- रामांच्या तेजस्वी पराक्रमाच्या अग्नींत याप्रमाणे सर्व कीटक जळून खाक झाल्यावर " नामा म्हणे एक उरलासे कंस | " पण त्याचीही शंभर वर्षे आतां पुरीं भरली होतीं ! कारण क्रोधानें खबळून गेलेल्या कृष्णांनीं त्याच रागाच्या सपाट्यांत चिस्या- सारखी कंसाच्या सिंहासनाजवळ उडी घेतली ! प्रचंड सिंहनाद करून व दंड थोपटून प्रभु आखाड्यांतून केव्हां उडाले व त्या सिंहासनाजवळ जाऊन केव्हां उभे राहिले हैं कोणास दिसलेंसुद्धां नाहीं ! श्रीकृष्णाचा तो नारसिंह अवतार पाहून कंसाची गाळणच उडाली - हात पाय लटपटू लागले, अंगाला दरदरून घाम सुटला, डोकींचा मुकुट मातींत पडला.-जणों कंसाने आपल्या मृत्यूचें प्रस्थानच ठेविलें ! वाघापुढे मेंढरूं किंवा सर्पापुढे बेडूक ठेवल्याप्रमाणे कंसाची हृदयक्रियासुद्धां बंद पडण्याची वेळ आली व कृष्णप्रभूच्या एकाच हिसक्याबरोबर तेंही काम झालें. " दुष्टा ! " कंसाच्या मोकळ्या केंसांस हात घालून त्याला सिंहासनावरून रंगांत ओढीत प्रभु म्हणतात " भोग आतां आपल्या पापांची फळें ! " प्रभूच्या ओढण्याच्या व जमिनीवर आपटण्याच्या त्या नुसत्या हृदयानेच इतका वेळ शौर्याचा आव चेहऱ्यावर दाखवून बडबड करीत सिंहासनावर बसलेल्या कंसाचा जीव निघून गेला ! नामदेवकृत वर्णन थोड़े निराळें आहे:- “ त्वरें जावोनिया धरियेला केशीं । पार्डिला भूमीसी दुष्ट बुद्धी ॥ वज्रप्राय मुष्टी वोपी नारायण | सोडियेला प्राण कंसें तेव्हां ॥ " प्रत्यक्ष परमेश्वराची वज्रमुष्टी ती ! सर्व ब्रह्मांडाचा चूर ज्या मुष्टीनें व्हायचा सापुढे कंसासारख्या घुंगुरट्याची काय कथा ? कंसवधाबरोबर कृष्णाच्या अंगावर धावणाऱ्या सुनाम्यास-कंसाच्या भावास- चळरामानें मधेच ठार केलें. याप्रमाणें " पापाचा अचळु " फिटला. कंस व याचे अनुयायी ठार झाले ! त्या वेळेस सर्व विश्वाला झालेल्या आनंदाचें व जयजय- "