पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ३५ ] भूत अशा गोवर्धनाचे - आपल्यावरील तृणादिकांनी गाईचें वर्धन - वाढ करणाऱ्या ह्या सुंदर पर्वताचें-पूजन करूं या " असे सांगून श्रीकृष्णांनीं त्याच दह्यादुधाच्या साहित्यांनीं त्यांच्याकडून ब्राह्मणांस बोलावून मोठ्या थाटांन गिरियज्ञ केला व कर- वेला व गाईचें पूजन करून त्यांस नानाप्रकारें शृंगारून त्यांनी त्या गोवर्धनास अनन्यभावें प्रदक्षिणा घातली. पाहून त्या मेघराजास "—इंद्रास सपाटून राग आला व हत्तीसारख्या दाट व काळ्या कुळकुळीत मेघांची आकाशांत एकच गर्दी उडवून हत्तीच्या सोंडेसारखी त्यांनीं जी मुसळधार पावसाची दृष्टि सुरू केली त्यानें सर्व मनुष्य, पशुपक्षी गांगरून गेले व प्रलयकाळ जवळ आला की काय असा भास होऊं लागला. दोन दिवस पावसाचा असा बेदम मार खाल्ल्यावर सर्व जीव मेटाकुटीस आले, आकाशांत सूर्यचंद्र आहेत की नाहींत याचा पत्ता लागेना; तेव्हां ह्या इंद्राच्या कोपापासून “ कृष्णा ! आतां तूंच आमचें रक्षण कर ! म्हणून सर्वांनी त्यास हात जोडले, “घाबरूं नका " असे श्रीकृष्णांनीं त्यांस अभय दिलें. व थंडीने काकडून गेलेल्या व जलमय झालेल्या गोकुळाचें रक्षण करण्यासाठी जवळच असलेला तो भव्य गोवर्धन पर्वत आपल्या एका करांगुलीवर उचलून धरला ! सात दिवस वृष्टि सारखी चालली होती; पण गोवर्ध- नाच्या व ' गोवर्धनधारी गोपालकृष्णाच्या संरक्षणाखाली सर्व गोकुळ सुरक्षितपणे "" आपले व्यवसाय करीत होतें. काय हे अद्भुत सामर्थ्य ! याच सामर्थ्याच्या जोरावर श्रीकृष्णास " उपेंद्र " ही पदवी प्राप्त झाली आहे. असो. पण वाचक ! अशाच • निरभ्र शारदी रात्रीं सम्राटाच्या श्वेत छत्राप्रमाणें आकाशोद्यानांत चंद्रमा स्वेच्छ विरहत - झुलत - डोलत असतां श्रीकृष्णांनी केलेल्या रासक्रीडेचें वर्णन वाचण्यास तुम्ही फार उत्सुक्त झालां असाल नाहीं ! चला तर आपण आतां तिकडेच वळूं. 66