पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २८ ] आनंदप्रद असेल याची कल्पनाच चित्त थरारून सोडते, आनंदानें गानें पुलकित होतात. असो. याप्रमाणे अपार असा " , 66 पण परमा रसाचा आनंद लुटून सायंकाळी सहा वाज ण्याच्या सुमारास श्रीकृष्णाची स्वारी सर्व सवंगड्यांसह व गुरांवांसरांसह घरीं परतली. कुंजवनाच्या सुमारें मध्यावर ते येतात तो 'अघासुर' नावाच्या राक्ष- साची धिप्पाड मूर्ति त्यांच्यापुढें प्रकट झाली ! “ कारे गवळ्याच्या पोरा ! " कृष्णास उद्देशन तो म्हणाला आमच्या कंसाचा तूं म्हणेशत्रु आहेस ? वारे शत्रु !" असें म्हणून तो अक्राळविक्राळ राक्षस विकटपणे एकदां खदखदां हंसला. अशा शत्रूला बाळपणींच ठार मारल्यावर मग तो शत्रु काय करणार ? झाडाचें रोपच उपटून फेंकून दिल्यावर त्याचा वृक्ष कसा बनणार ? औं ? काय रे ? ये तर; चल, मुकाट्यानें मरण्यास तयार हो" असें म्हणून तो असुर त्या सुरेश्वरावर धांवला. पण झगझगीत दिव्यावर झडप घालणारा पतंग कधी जिवंत सुटला आहे काय ? तीच गत त्या अघासुराची झाली व श्रीकृष्णाच्या हस्तें त्यास लवकरच सद्गति मिळाली. काय सद्गति मिळाली ? होय, प्रियवाचक, सद्गति मिळाली हे आमचें विधान अक्षरशः खरें आहे. कारण अंतकाली प्रभूच्या नुसत्या नामस्मरणानें- सुद्धां जर ईश्वरभावाप्रत प्राणी जातो. कारण " अंतकालेच मामेव स्मरन्मुक् कलेवरं । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः " असे प्रभुजींचेंच गीतेंत आश्वासन आहे-- ६- तर मग त्याच प्रभूच्या हातून प्रत्यक्ष मृत्यु आला असता तो प्राणी काय नरकांत जाईल ? हे केव्हांहि शक्य नाहीं. अघासुरच काय पण त्यानंतर मुर, कंस, चाणूर इत्याहि राक्षस व शिशुपालादि राजे जे कृष्णानों मारले. ज्यांना ज्यांना म्हणून कृष्णाच्या हातून देहदंड मिळाला ते ते सर्व प्राणी मोक्षास गेले. रामावतारी रामानों मारलेले असंख्य राक्षस व खुद्द रावण हेही असेच उद्धरून गेले आहेत. “ असंख्य खळ संगरों निजकरी तुवा मारिलें । ननिष्ठुरपणें, कृपा करु भव तारिले " असें पंत याचसाठी म्हणतात, अजामिळ, अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगला अशा गति दिली " असें तेच दुसरीकडे म्हणतात. यासाठींच “ परि भक्त का वैरिया व्हात्रे | माझिदाचि " असें ज्ञानोबा म्हणतात तें कांही खोटें नाहीं. अगा वरी फोडावयालागां | लोह पडो परिसाचे अंगों। परि ते मिळतिये प्रसंगीं । सुवर्णचि होईल " ही ज्ञानोक्तीही याचीच दर्शक आहे. याचसाठी 'कालिया- मर्दन प्रसंगीचें वर्णन करतांना "दंडप्रसंगांत कृपाच पाहे " असें शुकाचार्य 66 , 66 ,