पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७ ]

मानण्याचें कांहींच कारण नाहीं " असे सांगणाऱ्या त्या प्रभूला लहान बालक होण्याची तिनें प्रार्थना केली. मातेची इच्छा पुरी करण्यासाठीं परमात्म्यांनी लहान अर्भकाचें रूप घेतलें. त्याबरोबर पटकन त्यांना उचलून घेऊन देवकीनें त्यांना स्तनास लावलें ! देवकीला त्या मनमोहन बालकाचा अनिवार पान्हा आला व परमात्म्यास साकारतेचा अनिवार आनंद झाला. मातेची तृप्ति होईपर्यंत प्रभून तिचें स्तनपान केलें. तेव्हां कोठें देवाकीस बरें वाटर्ले. धन्य त्या देवकीची कूस की जिच्या पोटीं प्रत्यक्ष ईश्वरांनी जन्म घ्यावा ! वसुदेवदेवकीच्या ह्या भाग्याचे कोण वर्णन करूं शकेल? देवकीचा पुत्र म्हणून ' देवकीनंदन' व वसुदेवाचा मुलगा म्हणून " वासुदेव " अशा नांवांनीं त्या ' अनाम ' ईश्वरास जग पुढे संबोधूं लांगले हें योग्यच आहे. असो.

वासुदेव पुन्हां मोठे होऊन आपल्या पित्यास म्हणाले बाबा, आतां पुढील अनर्थ टाळण्याच्या उपायास त्वरित लागले पाहिजे. यासाठी तुम्ही मला एका पाटीत घाला व गोकुळांत नेऊन नंदाच्या इथे मला ठेवा. नंदाची भार्या यशोदा ह्याच वेळीं बाळंत झाली आहे. तिला झालेल्या मुलोस आपल्या पार्टीत घेऊन तुम्ही परत येथें या. " पण देवा ! हे सगळें बिनभोभाट व्हावें कसे ! बाहेर नंग्या तरवारीचा खडा पहारा, माझ्या हातापायांत बेडया, तुरुंगाच्या द्वारास भलीं मोठीं कुलपें, यमुना नदीचा अथांग प्रवाह, तुमच्या जन्माच्या आनंदानें जणो प्रेमाश्रूंचाच पूर लोटणाऱ्या मेघांचा बाहेर पडणारा हा मुसळधार पाऊस, देवा, था सर्व संकटांतून पार पडून मी निर्विघ्नपणें तुम्हास कसा नेऊं शकेन ? ” वसुदेवानीं शंका विचारली. " बाबा, त्याची तुम्ही कांहीं काळजी करूं नका. तुम्ही मला घमेल्यांत घालून चालूं लागा म्हणजे झालें. आटपा लवकर ! " ज्या प्रभूच्या ध्यानांत हजारों योगी वर्षानुवर्ष गुंगून पडतात त्या सांवळ्या प्रभूच्या बालमूर्तीचा विरह होणार ही कल्पना कोणाचे हृदय हेलावणार नाहीं ? त्यांतून वसुदेवदेवकीसारख्या आपल्या डोळ्यांदेखत सहा पुत्रांचा अमानुष खून पाहिलेल्या व त्या दुःखतापानें तप्त झालेल्या हळव्या हृदयाच्या दांपत्यास तर ती विरहकल्पना किती जाणवली असेल त्यांच्या डोळ्यांतून किती अश्रुधारा वाहिल्या असतील याची कल्पना करणेंहि कठीण आहे. मातापित्यांच्या शोकाचा पहिला आवेग शमल्यावर देव त्यांचे समाधान करीत म्हणतात बाबा, अशा रीतीनें तुम्ही शोक करीत बसल्यास आपल्या पुढील कार्यास उशीर नाहीं का होणार ? बरें, मी कांहीं फारसा लांब जात आहे असेंहि नाहीं. बाबा,