पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३]

ण्यास सुसंधी प्राप्त करून यावी व ऐतिहासिक, लंलित, पौराणिक, निबंधात्मक, चरित्रात्मक, काव्यमय अशा सर्व प्रकारचें उत्तम वाङ्मय प्रकाशित करून जनतेची व महाराष्ट्र साहित्याची सेवा करावी " असा जो प्रस्तुत मालेचा उद्देश तो पूर्ण करण्याचे काम आम्हांस साहाय्य करावें, अशी आमची त्यांजजवळ प्रेमाची प्रार्थना आहे. ती ते पुरी करतील अशी आशा आहे.

 अखेर प्रस्तुत पुस्तकानें सर्व आबालवृद्ध स्त्रीपुरुषांस– विशेषकरून सुशिक्षित कॉलेजिएट तरुणांस त्या श्रीकृष्णाचा त्याच्या मधुर मुरलीचा प्रेमळ प्रीतीचा, दिव्य सौंदर्याचा, व चिन्मय स्वातंत्र्याचा छंद लागो व त्या स्वातंत्र्याच्या, प्रेमाच्या, संगीताच्या दिव्य समाधींत डोलतां डोलतां 'भक्त ऐसे जाणा जे देहीं उदार ' असे तरुण भक्तवीर निर्माण होवोत अशी त्या प्रेममयाची प्रार्थना करून पुरें करतों.


ता. २२।१।२३. }

सर्वांचा नम्र-
गंगाधर.