पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
" कमले ' संबंधी लोक काय बोलतात ?


"ज्ञानप्रकाश, " ता. २१८।२२:-
" विवाह ठरणें तो वधूवरांच्या संमतीनें व पसंतीनेच ठरला पाहिजे ही गोष्ट सिद्ध करण्याचा लेखकांनी या कादंबरींत प्रयत्न केलेला आहे. कादंबरी वाचनीय झाली आहे. "


“ स्वराज्य " - २१/९/२२:-
" ही एक स्वतंत्र सामाजिक कादंबरी असून समाजहितदृष्ट्या या कादंबरीचा उपयोग विशेष होण्यासारखा आहे."


रा. रां. गोविंद कृष्ण टिळक ( वकील, बार्शी ) आपल्या (ता.२|८|२२ च्या पत्रांत लिहितात:-

" आपण आपली कादंबरी नजर म्हणून मला दिली त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.

पुस्तक वाचलें. तासभर चांगली करमणूक झाली. आपलें उद्दिष्ट कार्य यशस्वी होवो " इ.