पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८८ ]

जाग झालेला पाठिराखेपणा सर्व जगाला जाहीर करीत आहे, विदुर, रुक्मिणी ह्यां सारख्यांच्या उत्कट भावाला देव भुलला तेंहि हेच सांगत आहे. श्रीकृष्णाचा पराक्रम किती दांडगा होता है पूतना, तृणावर्त, शकटासुर, इत्यादि शेंकडों राक्षस गोकुळांत मारले, रुक्मीसारखे वीर 'शिशुसम' आणले, व चाणूर, कंस, शिशुपाल इत्यादि राक्षसांस ठार केलें, कालियासारखा भयंकर सर्प जेर केला इत्यादि गोष्टींवरून दिसून येणार आहे. गोवर्धनासारखे पर्वत करांगुलीवर उचलून - तोलून धरणे, अरण्यांतील दावाग्नि पिऊन टाकर्णे इत्यादिकांवरून त्याच्या शारिरिक व विशेषेकरून आत्मिक बलाची प्रतीति येते. श्रीकृष्णाच्या पायाशीं मथुरेचें राज्य लोळत असतां व सबंध पृथ्वीचे राज्य काबीज करण्याची अंगांत कुवत असतां तिकडे त्यांनीं ढुंकूनहि पहिलें नाहीं व शेवटीं तो गवळ्याचा पोर' च राहिला ह्यावरून त्यांची अलौकिक निस्पृहता दिसून येते. महत्त्वाकांक्षेच्या ‘एकच प्याल्यां’त बुडालेला नेपोलियन, शिकंदर इ. कुठें व आमचे भगवान् कुठें ! पण या सर्वांहुनि गोडगोड' अशी, विशेष उत्कटपणें जर कृष्णचरित्रांतील कोणची गोष्ट मनावर ठसत असेल तर ती म्हणजे त्या श्यामसुंदराच्या प्रेमाचें दिव्यमोहन हीच होय. श्रीकृष्ण व गोपी ह्यांच्या अलौकिक प्रेमाचे चित्र चित्तास आकर्षून घेते. पण याहूनही हृदयास डोलविणारा देखावा म्हणजे केवळ गोपीच नव्हेत तर प्रभूच्या नांवानें व प्रभूच्या ध्यानानें अखिल गोकुळांतील चराचर सृष्टीस जे वेड लागलें होतें तो होय. श्रीकृष्णाच्या—त्या घननीळ सांवळ्या कन्हय्याच्या - मुरलीच्या मधुरतम संगीताबरोबर सर्व गोकुळाची स्थिति कशी होत असे - नदीजलावरील तरंग, वायूनें डोलणारी तृगराजी, संथपणे चरणारी गोधनें, सांसारिक व्यवसायांत मन झालेल्या गोपी व गोपचालें, किंबहुना सर्व गोकुळ कसै त्याबरोबर ' थिजत' असे-नाचत असे — डोलत असे ह्याचें वर्णन आम्ही मार्गे केलेंच आहे; आणि सर्व चराचराचें हैं दिव्यमोहन व कृष्णवियोगकालीं त्याचे होणारें करुणरुदन हा देखावा सर्वोत काव्यमय व हृदयस्पर्शी नाहीं असे कोण म्हणेल ?
 अशा 'प्रेमगोड' गोपालावर कोण बरें प्रेम करणारं नाहीं? कृष्णकन्या च्या माता-पित्यांचें त्यावर किती उत्कट प्रेम होतें हैं "मथुरेसि नेता श्रीकृष्णनाथ । तेचि क्षणीं आमुचा प्राणांत " होईल ह्या त्यांच्या उद्ववार्शी बोलतांना निघालेल्या एकाच उद्गारावरून स्पष्ट होत आहे. गोपबाळांचें प्रेम -अहाहा, लहानपणों केवळ आईबापांचा लळा असणारौं तीं बार्के श्रीकृष्णानीं गद्गदून सांगितल्याप्रमाणे "आईबाप त्यजूनि बाळें मज-