पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८६ ]

भक्ती व " देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भात्रो असा दृढ निश्चय हवा.
 असो. या ठिकाणीं श्रीकृष्णप्रभूच्या चरित्राचे स्वतंत्र अर्से बहुतेक कवन संपलें यापुढील भाग म्हणजे इतर सज्जनांप्रमाणें प्रभूद्दी पांडवपक्षी कसे झाले, त्यांनी द्रौपदीला पाठची बहीण मानून तिचें वारंवार सत्त्वरक्षण कसें केलें, व जरासंध, शिशुपाल, दुर्योधन इत्यादि दुष्टांना मारून एकंदर पांडवांना सुरक्षित ठेवून त्यांची सेवा बजावीत व त्यांस सौख्य देत त्या केशवकैवर्तकानें त्यांना अल्लाद असे भारतीय रणनदीच्या पार करें उतरविलें तो समग्र इतिहास " महाभारता"शीं अत्यंत निगडित आहे व तो आपण महाभारतां " त वर्णिलाच आहे.
 प्रत्येक साकार वस्तूम अंत हा केव्हांना केव्हांतरी आहेच. आलीया आकारा अवघें नासें ” अर्हे तत्त्वच आहे. तें ईश्वरी अवतारास देखील चुकत नाहीं. व त्या-प्रमाणें पुढे सर्व यादत्रांमध्ये मद्योन्मत्त अशी " यादवी " माजली त्यावेळेस आमचे प्रभूद्दी एका व्याधाचा बाण शयितावस्थेत पायाच्या अंगठयास लागण्याचें निमित्त होऊन ह्या नश्वर देवाचा त्याग करून गेले ! कर्तुमकर्तुं शक्ति असणा-या परमात्म्या- नीहि केवळ वरील तत्त्वाची सत्यता पटवून देण्यासाठी कालवशात् निजधामीं गमन कलें! अशा रीतीनें तँ सुंदर रूप, सहज दृश्य अशी ती सांवळी मूर्ति जरी कालाच्या अनंतोदरांत - स्वतांच्याव अपरख्यांत विलीन झाली असली तरी तिच्या निस्सीम उपासकांच्या-पुंडलिकानीं सुरू केलेल्या भागवत सांप्रदायांतील शेंकडों भक्तांच्या - ती दृष्टीस पडली आहे; नाथांच्या साठी तिनें गंगेचें पाणी वाहिलें, जनाबाईचीं धुण धुवून तिला दळणकांडणास मदत केली, सांवतामाळ्याची भाजी खुडली, कचिराचे शेले विणले, तुकोबाच्या वह्या राखल्या, फार काय - दामाजीसाठी तो दनिदयाळ 'विठु महार' ही झाला व यापुढेही प्रत्येक निस्सीम भागवतास तो असाच साकार व सगुण भेटणें शक्य आहे. अशा त्या परममंगल प्रेममय प्रभूच्या चरणीं अनन्यभावानें नमस्कार करून आपण त्या अनंताच्या चरित्रावरून एकदां-शिरस्त्याप्रमाणें--शेवटची विहंगमदृष्टि टाकूं.
 श्रीकृष्णाच्या त्या रम्य गोकुळाचा, तेथील त्या रमणीय निसर्गाचा, त्या अनागस गोपबालांचा, कृष्णभक्तीनें वेड्या झालेल्या त्या गोपसुंदरींचा कधीतरी विसर पडणें शक्य आहे काय? कृष्णकन्हय्याच्या ' सुनील तनुची ' सांवळी ' घवघवीत प्रभा' नयनापुढून कधीतरी हलणें शक्य आहे काय ? त्याच्या बांसरीचें तें प्रेमसंगीत हे कान कर्धीतरी विसरतील काय ? प्रभूच्या प्रेमाचा तो दिव्य विलास मनःसागरा-