पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० सालरजंग प्रकरण व मद्रास. व भट्टांनी घरीं येऊन अण्णासाहेबांस ही सारी हकीगत सांगितली. तेव्हां 'काय असेल कोण जाणें,' असे म्हणून अण्णासाहेब उगाच राहिले. परंतु तेव्हांच त्यांच्या मनास खूण पटली कीं, ही स्वामींची कांहीतरी लीला आहे. त्यानंतर पुढे ते स्वामींस भेटावयास गेले. या प्रसंगी स्वामींची व अण्णा- साहेबांची भेट आळंदीस झाली, आणि स्वामींनी अण्णासाहेबांना मद्रासेस जाऊं नये, ह्मणून सांगितल्यावरून दोघांचें एक रात्र बरेंच भांडण झालें, असें कित्येक मंडळी 'खात्रीलायक' सांगतात, परंतु तें अगदीं चुकीचें आहे. कारण वरील हकीगत व कृष्णाजीपंत रानड्यांचा चमत्कार, हीं दोनही खुद्द अण्णासाहेबांच्या तोंडून कमीत कमी ५१६ वेळ तरी मी व आणखी इतरांनी ऐकिली आहेत, असे अतिशयोक्ती न करतां ह्मणतां येईल. या प्रसंगी महा- राजांनी अण्णासाहेबांस फक्त एकच गोष्ट सांगितली कीं, 'उद्यां जाऊं नकोस.' यावर 'आपण जाणारच,' असे अण्णासाहेबांनी आग्रहाने सांगितल्यावरून ‘ बरं तर, जाशील तसा येशील, ' एवढेच ह्मणून 'दादा, मद्रासहून येतांना कंचीस जाऊन ये, ' असें महाराजांनी त्यांना सांगितले. यापरतें दोन्ही दिवसांत या विषयासंबंधी कांही जास्त झाले नाही. ता. ११ आक्टोबर सोमवार रोजी मराठा व केसरी, यांचें डिक्लेरेशन करून, दुसरे दिवशी, मंगळवारी, मद्रास मेलनें अण्णासाहेब मद्रासेस जावयास निघाले. कांहीं आकस्मिक सरकारी कामामुळे, ठरल्याप्रमाणे सालरजंगास गाणगापुरास येतां आलें नाहीं, व त्यानं तर, लागलीच ते परलोकास गेल्यामुळे दोघांची भेट होण्याचा संभव राहिला नाहीं. मद्रास येथें असतांना, मद्रासेजवळ तिरुपूर म्हणून छोटेसें गांव आहे, तेथील सुब्रावअय्या म्हणून कोणा गृहस्थांच्या घरीं यांचा मुक्काम होता. वरो- बर आचारी, गडी, वगैरे स्वतंत्र सरंजाम होता. त्यापैकी यांचा गडी रामा धायरीकर हा अजूनही धायरीस हयात आहे. ज्या कामाकरितां अण्णासाहेब मद्रासला गेले होते, तेंही जवळ जवळ वऱ्हाडच्या मसलतीसारखेच होतें. परंतु ते तेथे गेल्यावर नेहमीप्रमाणे एक कटकट उत्पन्न झाली, आणि तें काम रेंगाळले. हातीं घेतलेलें काम मध्येच सोडणें यांस ठाऊक नसल्यामुळे, यानंतर ते मद्रासेसच ठाणें देऊन वसून राहिले. त्यामुळे तेथे जवळ जवळ ३|| वर्षे मुक्काम पडला ! हा वेळ त्यांनी पुरश्चरणे व इतर तऱ्हेचे