पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. सिक्युरिटी असेल तर, लागल्यास २ काय पण तीन कोटी देतों, पण ब्रिटिश सिक्युरिटीशिवाय देतां येणार नाही, ' म्हणून मोकळे झाले. भिकाजीपंत देश- • पांडे आणि भाऊराव यांस विचारतां त्यांनी ती गोष्ट तत्काळ कबूल केली; त्यावर ' आपल्या मालकास विचारून पहा, उगीच कांहीं तरी सांगू नका, म्हणून सालरजंगनें सांगितले. परंतु या हस्तकांची स्वतःच्या मालकाच्या कर्तव- गारीवर एवढी जबर श्रद्धा होती की, त्यांनी ठांसून उत्तर दिलें 'त्यांत काय विचारावयाचें आहे ? आपण सांगाल तेव्हां पैसे पावते करतों!' तेव्हां आश्चर्य वाटून सालरजंगानें सांगितले की, 'मुंबईस तार करून बसल्या बैठकीस पैसे मागवावे. ' त्याप्रमाणें तार करून उत्तर येईपर्यंत उभयतांसही त्यांनीं कचेरींतच बसवून ठेवलें. इकडे अण्णासाहेब नुकतेच मेडिकल कॉलेजमधून घरी येऊन बसले होते, तोंच तार येऊन पोहोचली. तेव्हां 'काय करावें ? ' असा त्यांनाही क्षणभर विचार पडला. कांहीं वेळ शांतपणे विचार करून लागलीच ते उठले, आणि प्रो० डॉ० स्मिथ यांची गांठ घेऊन, त्यांना ' अमुक तऱ्हेचें कर्ज पाहिजे' म्हणून त्यांनी सांगितलें. स्मिथनें, शिष्यावर किर्ताही लोभ असला तरी, इंग्लिश लोकांच्या व्यावहारिकपणास अनुसरून मध्यस्थी करण्याचें कबूल केलें, आणि त्याची दलाली नीट ठरल्यावर, त्याच्या मध्यस्थीनें फ्रेंच बँकेतून '२ कोटी रु. तयार आहेत, कोठें व कसे पाठवावयाचे, तें कळवा, ' म्हणून सालरजंगास तार करविली ! अण्णासाहेबांचे कारकून या अधिकपणानें फजीत होणार म्हणून सालरजंगाला खात्री वाटत होती. तेव्हां तार वाचतांच तो अगदी चकित होऊन गेला ! त्यानें ' तूर्त असू द्या, मागाहून कळवितों,' अशी तार केली. मग मात्र त्यास विश्वास पटून त्यानें या कामास हात घातला, आणि फ्रेंच बँकेच्या मार्फतच १२ कोटींचे कर्ज काढावयाचे ठरविले. परंतु हा त्याचा खेळ अण्णासाहेबांस चांगलाच भोंवला. स्मिथची दलाली, आणि २ कोटींवरील व्याज - थोड्याच वेळाचे कां होईना-यांची रक्कम अशीच कांही तरी २-४ लाख रु. होती, व हें कर्ज अखेरपर्यंत अण्णासाहेबांस फेडावें लागलें !! पुढचा व्यवहार सिद्धीस गेला असता तर हें बोकांडी बसलें नसतें, परंतु सालर- जंगाच्या मृत्यूनें सर्वच घोंटाळा करून टाकला.