पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालरजंग प्रकरण व मद्रास. सुराज्यं स्वातंत्र्ये किमपि न तु शक्यं सति परे सुराज्ये जीवानां सकलपुरुषार्था ननु सुखम् । सुखं सर्वेषां तत् सद्सदिति वैयक्तिकमहो कथं तस्दूत्यर्थं प्रभवति विना तस्य यजनम् ॥ कादा प्रांत हाती असल्याशिवाय आपल्या मनाजोगें काम करितां येणार > नाहीं, अशी त्यांची लवकरच खात्री झाली, हें मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. त्या दिशेनें विचार करितां, त्यांच्या पसंतीस निजामानें नुकताच इंग्र- जांचे ताब्यांत दिलेला वऱ्हाड प्रांत उतरला. सांचलेल्या कर्जाच्या फेडीकरतां ह्मणून हा प्रांत इंग्रजांस देण्यांत आला होता; परंतु ही गोष्ट त्यावेळचे निजाम- साहेब आणि खुद्द मुख्य दिवाण सर सालरजंग, यांच्या मनास फार लागून राहिली होती. सालरजंगांची योग्यता मुत्सद्दी या नात्यानें किती मोठी होती, व बिस्मार्क, गॉर्ड्सचकॉफ वगैरे इतिहासप्रसिद्ध मुत्सद्यांत बसण्यास ते कसे लायक होते, ही गोष्ट सर्वमान्य आहे. स्वतः त्यांनी विलायतचा प्रवास केला होता, त्यामुळे इंग्रजी राज्याचा आणि राजनीतीच्या अंतःस्थितीचे त्यांस चांगलेच ज्ञान होतें. वहऱ्हाड प्रांत इंग्रजांपासून सोडवावा, अशी त्यांस रात्रंदिवस तळ- मळ होती. अशा स्थितीत सालरजंगास हाताशी घेऊन, आणि ज्या कर्जाच्या बदल्यांत वऱ्हाड घेण्यांत आले होतें, त्या कर्जाची फेड करून, जर वहाड मोकळें करतां आलें, तर आपले मनोरथ सिद्धीस नेण्यास तें कार्यक्षेत्र उत्तम आहे, असें अण्णासाहेबांनी ठरविलें, व त्याप्रमाणें सालरजंगाशीं बोलणें सुरू केलें, आणि सालरजंगासही हा विचार पटून त्यानेही आपली अनुकूलता दाखविली. इतकें होण्यास अण्णासाहेबांना किती खटाटोप करावा लागला असेल, 'कोणकोणती धोरणे ठेवावी लागली असतील, कोठें कोठें संधान बांधावी लागलीं असतील, वगैरे इतिहास मनोरंजक असला तरी सदैव अज्ञातच राह- णार. त्यावेळच्या काम करण्याच्या दिशेसंबंधानें ते सांगत असत कीं, कांहीं