पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

920 Apr ॥ श्री ॥ प्रस्तावना. पार्थ ह्मणे तो कोण ब्रह्मर्षि असे मनोरमहि म्यां तें । तद्यश नसे परिशिले सांग सख्या तूं तदीय महिम्यातें ॥१॥ पंत. १ श्रीअण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र आणि तें माझे हातून व्हावें ही एक थोडी अकल्पितच गोष्ट आहे. धड मला नाहीं त्यांचा दीर्घकाल सहवास घडला नाहीं धड कधीं त्यांच्या विषयी विचार केला. सर्वांगाचे कान करून त्यांचे शब्दही कधीं ऐकिले नाहींत अथवा अंतःकरणाच्या पेटीत मोठ्या लोभानें ते जपून ठेवण्याचा प्रयत्नही कधीं केला नाहीं. शोधकदृष्टीने त्यांच्या- कडे पाहण्याची माझी ताकद नव्हती, शिष्यबुद्धीनें त्यांच्या पायापाशीं बसण्या- इतकी पात्रता नव्हती, विद्यार्थीपणाने त्यांचा फायदा घेण्याइतका साक्षेप आंर्गी नव्हता, प्राप्त पुरुष म्हणून त्यांचेकडे बघण्याइतकें वैराग्य नव्हतें, अवतार म्हणून म्हणण्याइतकी श्रद्धा नव्हती, संत म्हणून भजण्याइतका भाविकपणा नव्हता, राष्ट्रपुरुष म्हणून आदर करण्याइतकी राष्ट्रहितैकता नव्हती, विद्वान् म्हणून कौतुक करण्याइतकें बुद्धिसामर्थ्य नव्हतें. गुणरत्नाकर म्हणून वुडून जाण्याइतका वेकूब नव्हता अथवा विक्षिप्त पुरुष म्हणून चेष्टा करण्याइतकी टवाळीही आंगी नव्हती. एकादें ओझरतें दर्शन व्हावें अथवा एकादा गोड विचार क्षणमात्र चमकून जावा अथवा पवित्रपणाची एकादी बारीक लहरी सहज अंतःकरणास थरारून जावी त्याप्रमाणे या आयुष्यांतील अतिशयच अल्प काळ भासलेले तें एक स्वप्न होतें. त्यांतच आधिव्याधींनीं अगर्दी गस्त होऊन गेलो होतों. अशा स्थितीत चरित्रकारास लागणारी दृष्टी त्या वेळी कोठून असणार ? वर सांगितलेल्या गोष्टींपैकी कित्येक ज्यांच्याजवळ आहेत, ज्यांनीं आस्थापूर्वक आणि भक्तिपूर्वक एकनिष्ठेनें वर्षेच वर्षे त्यांच्या सेवेंत घातली आहेत त्यांची बारीक सारीक गोष्ट त्यांचा एकादा देखील कृपणपणानें आपल्या स्मृतिरूप खजिन्यांत सांठवूनही पंताच्या म्हणण्याप्रमाणे ज्यांचा हावरेपणा गेलाच नाहीं किंबहुना नदीनें समुद्रांत मिळून जावें त्याप्रमाणे आपले सर्व