पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राजकारणांतील उलाढाली. ३९ संपादिले, तें एवढ्याचकरितां. जंजिरा, सांगली, डफळापूर वगैरे संस्थानांच्या अपिलाची कामे त्यांच्या हातून इतक्या उत्कृष्ट रीतीनें त्याचमुळे झाली. या दिशेनें काम करण्याविषयी त्यांच्या कल्पना हळू हळूं निश्चित झाल्या. काठे- वाडांतील बारीकसारीक संस्थानांतील राजकारण हाती घ्यावें, व त्यांचा एक संघ बनवून कांहीतरी करून दाखवावें, अशी त्यांची पहिली कल्पना होती. यांच्या बैठकीत कुसुंब्याचा प्रवेश अशाच निमित्तानें म्हणून झाला, असें ते सांगत. वढवाण, लिमडी वगैरे ठिकाणचे एजंट नेहमीं तेथें येत, त्यांच्या आवडीची चीज म्हणून कुसुंचा तयार ठेवावा लागे. त्यानंतर वकील झाल्यावर, त्यांना बडोदे संस्थानची दिवाणगिरी सांगून आली तेव्हां देखील, आपले वरील उद्देश पूर्ण करावयास सांपडावे म्हणून, दिवाणगिरीचा मान व पैसा न पत्करतां बडोद्याची परराष्ट्रीय मंत्र्याची जागा मिळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पगार घेऊन बडोदें सरकारचे आपण नोकर होणार नाहीं, फक्त ऑफिसच्या सरंजामापुरता तीनशे रु० दरमहा घेऊन मुंबईतच राहूं, अशा त्यांच्या अटी होत्या, कारण इंग्रज सरकारचे ताबेदार असलेल्या संस्थानांची नोकरी करणे देखील त्यांना अशक्य होते. या अटी इतक्या साध्या होत्या की, केव्हांच हा सौदा ठरून गेला असता. परंतु यांची दुसरी अट अशी होती की, अत्यंत बारीकसारीक गोष्टीपासून तो वाटेल तितक्या महत्त्वाच्या गोष्टीपर्यंत, प्रत्येक प्रकरण आपल्या नजरेंतून व संमतीनें गेलें आलें पाहिजे; जर त्या वेळेस बडो- द्यास कोणी संस्थानिक असता, तर कदाचित् हीहि गोष्ट ठरली असती. परंतु मल्हाररावाचे प्रकरण नुकतेंच होऊन गेलें होतें, आणि बडोद्यास रीजन्सी होती. मल्हाररावाच्या प्रकरणांत अण्णासाहेबांनी काय भाग घेतला होता हेही सरकारास माहीत असावें. त्यामुळे या शेवटच्या अटीवर न जुळल्यामुळे हा प्रयत्न त्यांनी सोडून दिला, व त्या जागेवर सरटी. माधवराव यांची नेमणूक झाली. त्यानंतर मोठी मानाची जागा देऊन गिब्ब्ज कां असाच कोणी अॅक्टिंग गव्हर्नर होता, त्याने त्यांना सरकारी नोकरीत अडकविण्याचा प्रयत्न केला. यां गिव्जचें व अण्णासाहेबांचें बरेंच चांगले असून गव्हर्नरसारखे अधिकारी कितीही पालटले तरी, त्यांच्याजवळील अतीशय गुप्त व खासगी ब्लयू बुकाच्या साहा- य्यानें राजशासन एकसूत्री कसें राखले जातें, व मागील गव्हर्नराच्या कार-