पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रंगेल मंडळींच्या संगतींत निःसंग अण्णासाहेब. २९. मोठा आदर उत्पन्न झाला. सावकार लोकांत आणि व्यापारी मंडळीत अण्णासाहेबांचें. जे पुढें वजन बसलें, त्याला मुरारजी शेटजींचीच मदत झाली असावी. सकाळी वा दुपारीं मेडिकल कॉलेजमध्ये जावें, संध्याकाळी Law Class मध्यें हजर व्हावें, व उरलेल्या वेळांत आणि रात्रीं सर्व तऱ्हेच्या उठाठेवी कराव्या, असा यांचा कार्यक्रम असे. इतक्या थाटाने रहात असले तरी खाणेपिणें वगैरे सर्व शारीरिक बाबीसंबंधानें तेव्हांपासून हे अतिशय उदास असल्यामुळे इतर लोकांनी कितीही चैन केली तरी स्वतः यांची अशी स्थिति असे की, कित्येक वेळां पद्धतशीर जेवण्यास देखील वेळ सांपडूं नये ! थोडासा उपहार करून सकाळींच बाहेर पडावें, तो रात्री २-२, ४-४ वाजेपर्यंत कांहीं तरी व्यव- सायांत गुंतून गेलेले असावें; जेवण पदरांत पडेल तेव्हां पडेल !. कित्येक वेळां चार चार दिवसांत मुळींच झोंप नसे ! आंथरुणाची व याची गांठ कधींच पडली नाहीं ! तास दोन सांपडल्यास तेथल्या तेथेंच बैठकीवर लुंडकावें, अशी स्थिति तेव्हांपासूनच होती. मुंबईस येतांना जो बिछाना बांधून आणावयाचा, तो परत पुण्यास जातांना झटकून पुन्हा बांधावयाचा,, असेंच बहुतेक होत असे ! एकदां सहा महिन्यानंतर तो असा झटकीत असतां त्यांत दोन मोठाले विंचू व एकदोन गोमा निघाल्याचें अण्णासाहेब सांगत असत ! पूर्वी सांगितल्याप्रमाणें हे हौशी असल्यामुळें व धर्मास विरुद्ध नसलेली कोणती गोष्ट करण्यास यांची सदैव तयारी असल्यामुळे, यांच्या बैठकींत अखंड, रंग भरलेला असे. पानतंबाखूचें तर इतकें विलक्षण वेड होतें कीं, रोज यांस एकट्यांस अदपाव तंबाखू लागत असे! त्याच मानानें पानांचाही खप असे. चांदीच्या मोठ्या संचांत त्रयोदशगुणी विड्याचें साहित्य पडलेलें असे, त्याचा रोज किती खप होत असेल, याचा पत्ताच नव्हता. चिलीम, हुक्का, इंग्रजी तऱ्हेचे चिरूट, गांजा, भांग, कुसुंबा वगैरेंचाही आदर येथें प्रेमपूर्वक होत असे. या सर्व गोष्टींत श्रीअण्णासाहेब यांची बहुतकरून सर्वांवर ताण असे. परंतु त्यांत अशी खुबी होती की, कुसुंब्यासारख्या व्यसनाच्या देखील. ते कधी आधीन झाले नाहीत. समोर असतांना वाटेल तितकी चैन करावी, परंतु मागें त्याची आठवण देखील होऊं नये, अशी निःसंगता त्यांचे ठिकाण: स्वभावसिद्धच होती. गाण्याचा व वाजविण्याचाही उत्कृष्ट तऱ्हेचा शोक तेथें चाले. स्वतःच्या श्रीमंतीमुळे व औदार्यामुळे, मुरारजींच्या सहवासानें व आंगच्याच