पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपसंहार. ( पुडकेंच होय. जसजसा सुसंस्कृतपणा जास्त, तसतसें हैं पुडकेंही अर्थातच जाड असावयाचें. सर्व हुंड्या पटवून संतोषानें दुकान बंद करणाऱ्या सावकारा- प्रमाणें, सर्व प्रकारची देणीं घेणी नीटपणे उरकून, कोणतीही जबाबदारी शिल्लक नाहीं, अशा रीतीनें ज्याला येथून जातां येईल, तो खरोखरच धन्य आहे. मनुष्याणां सहस्रेषु' क्वचित् एकाद्या पुण्यवंताच्या वाट्यास केव्हां केव्हां अशी धन्यता येते. ती कांहीं वाटेवर थोडीच पडली आहे ? अशी धन्यता सर्वांच्या वांट्याला जरी येत नसली, तरी या धन्यतेकरितां अवंचकपणानें धड- पड करणें हेंच मनुष्याचें कर्तव्य आहे. ती त्यानें केली तरच त्याच्या मनुष्य- पणाची सार्थकता झाली, असे म्हणतां येईल. जवाबदारी म्हटली, की तिचे आणि अनिर्बंधतेचें वांकडेंच असणार. किंबहुना जवाबदारी म्हणजेच निर्बंधता. अंगावरील जबावदारी घट्टपणानें झुगारून देणारा, भित्रेपणाने सोडून देणारा, अगर वंचकतेनें टाकूं पहाणारा पिंडपोषक, आणि त्याचा पुच्छविषाण वान् बांधव यांच्यांत वस्तुतः कांहींच भेद नाहीं. व्यक्तिस्वातंत्र्य, अद्वैती वेदांत, असल्या ढोंगांनी आपल्या कृतीचें समर्थन संतोषानें करणारा तर त्याहीपेक्षां हीन कोटींतील म्हटला पाहिजे. मनुष्याच्या जबाबदाऱ्या अनेक प्रकारच्या, आणि अत्यंत परस्परविरोधी अशा असतात. त्यांतील कोणच्या जबाबदारीला किती महत्त्व यावें, कोणची जबाबदारी सोडून द्यावी, व कोणची हाती घ्यावी, वगैरे प्रश्न व्यक्तिविषयक आहेत. व ते ज्याचे त्यानें, पूर्वकर्मसंपादित सामुग्रीच्या अनुरोधानें सोडवावयाचे आहेत. परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की, श्रीमन्नृसिंहसरस्वती सद्गुरुदेवांनीं म्हटल्याप्रमाणें 'कर्मवंचकू अधःपाता । जातां वेळ नलगेची ' ॥ हा सिद्धांत मात्र अबाधित आहे. येथें कांहीं क्षमा नाही. मग कोणी कितीही मोठा असो, अगर केवढ्याही उदात्त हेतूनें व पवित्र कारणाने ती कर्मवंचकता घडली असो. जेवढ्यापुरती वंचकता, तेवढ्यापुरता त्या मानानें अधःपात ठेवलेलाच. कर्म करून देखील यश पदरांत पडेलच अशी खात्री नाहीं; वंचकता केल्यास अधःपात माल ठेवलेला ! पथ्य पाळून देखील रोग बरा होईलच असें नाहीं, पण कुपथ्य केल्यास मात्र मृत्यू ठेवलेला, अशा तऱ्हेचा हा सिद्धांत आहे. अशा कैक प्रकारच्या जबाबदाऱ्या आस्तिक, नास्तिक अथवा आस्तिक म्हणून मिरविणारे वास्तविक नास्तिक, हे सर्वच मानतात. परंतु यांच्यांत मोठा भेद असा आहे की, नास्तिकाचा जबाब घेणारा कोणी एक नसून, प्रसंगाप्रमाणें ते O