पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबईतील बारा वर्षे. नरोऽपि परतंत्रो यः तस्य कीदृङ्मनुष्यता । — श्रीमार्कंडेयपुराण. अण्णासाहेब मुंबईस आले. त्यावेळी आपणास वैद्यकीचा अभ्यास करावा लागेल, अशी त्यांच्या डोक्यांत कल्पना देखील नव्हती. L L. B. चा अभ्यास करावा, व डोक्यांत असलेल्या अनेक कल्पनांना मूर्त स्वरूप द्यावें, अशा दुहेरी इच्छेनें ते मुंबईस आले. त्याच वेळी त्यांच्या मतांची दिशा, अगदी ठाम ठरून गेली होती, असें अर्थातच म्हणतां येणार नाहीं. परंतु जरी ती तितकी पक्की ठाम ठरली नसली, अथवा महादेव गोविंद, विष्णुशास्त्री पंडीत, अशांच्या सहवासानें, आणि चळवळींतील अनेक अनु- भवांनी तिच्यावर पुढे संस्कार झाले असले, तरी कोणच्या दिशेनें काम करा- वयाचें, या विषयी त्यांचा निर्धार झालेला होता. देशांत त्या वेळेला देशोद्धाराचा प्रश्न आपापल्या मतानें सोडविणारी चार प्रकारची मंडळी होती. कांहीं लोक श्री. तात्यासाहेब रायरीकर यांच्यासारखे तपस्यैच्या मार्गानें आपले उद्दिष्ट साधेल, अशी श्रद्धा असणारे होते. दुसऱ्या एका प्रकारचे लोक, जर व्यवस्थित रीतीनें प्रयत्न केला तर, इंग्रज सरकारशी लढाई खेळून देखील, स्वातंत्र्य परत मिळवितां येईल, अशी हिंमत बाळगून होते. सात आठ वर्षांनंतर प्रसिद्धीला आलेले वासुदेव बळवंत फडके हे ह्या वर्गाचें उदा- हरण होत. या दोनही वर्गांचा इंग्रजी शिक्षण व इंग्रजी संस्कृती यांच्याशी संबंध मुळींच नव्हता, अगर अगदींच बेताचा होता. गेलेले स्वातंत्र्य परत तर मिळ- वावें, परंतु तसे होण्यास इंग्रजांच्या संस्कृतीइतकी आपली भौतिक संस्कृती वाढल्याखेरीज गत्यंतर नाहीं, म्हणून ती वाढविण्याचा प्रयत्न करणे हाच उद्धाराचा मार्ग आहे, असे म्हणणाराही एक वर्ग होता. या लोकांस आपली संस्कृती राजकर्त्यांच्या संस्कृतीहून, एक तर कमदर्जाची, अथवा पूर्वी जरी चांगली असली, तरी हल्लींच्या काळी निरुपयोगी अशी वाटत होती. या लोकांनी समाजसुधारणा, धार्मिकसुधारणा, वाङ्मयप्रसार वगैरे दिशांनी प्रयत्न चालू केले ू