Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची स्वतंत्र विचारसरणी. १३३ या गोष्टीकडे त्यांनी यत्किंचित् लक्ष दिलें नाहीं. त्यामुळे बहुतेक प्रसंग असा येई. की अर्ज मुदतीच्या अखेरच्या दिवशींच जावयाचा. अर्जाची भाषा उद्दाम नसे परंतु आर्जवी मुळींच नसे. एखादा वक्ता आपले म्हणणें श्रोत्यांना ज्या तऱ्हेने समजावून देतो, त्याप्रमाणे निर्भीडपणें त्यांनी आपल्या मुद्याचें सर्वत्र समर्थन केले आहे. त्यामुळे व्यक्तिविषयक संदर्भ काढून टाकून निरनिराळ्या लेखांतील विचारसरणीचेंच जर एकीकरण केले तर कायदेशास्त्राचा एक ग्रंथ होईल. सर्व विवरण अशा चोख पद्धतीचें आहे. त्यांच्या पारमार्थिक आचर- णांतील पुष्कळ गोष्टींचा उलगडा सामान्य मनुष्यास होत नसे. व त्यांनीही त्याचा हेतु फारसा कोणास सांगितलेला नाही. परंतु ज्याप्रमाणे त्यांच्या वैद्यकीय प्राविण्याचा आणि निरपेक्ष वैराग्याचा अनुभव सर्व जनतेस वाटेल तसा व वाटेल त्यावेळीं घेतां आला त्याप्रमाणेच त्यांच्या कायद्यांतील निरनिराळ्या तत्त्वांच्या विवेचनाचा अनुभव घेण्याची त्यांच्या लेखामुळे सोय झाली आहे, नाही वैद्यकशास्त्रावर त्यांनी ग्रंथरचना केली नसल्याकारणाने त्यांचे वैद्यकीय चातुर्य आतां आख्यायिकेतच शिल्लक राहिले आहे. तशी गोष्ट त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाची नाही. त्यासंबंधाने किंवा राज्यघटनेसंबंधानें त्यांचे जे विचार होते ते त्यांच्या लेखांत आज उपलब्ध आहेत. जामनविर मालकी राजाची कधीं नव्हती व असणे अन्याय्य आहे असें त्यांचे मत होतें. त्याचप्रमाणे राजा हा लोकांनी निवडलेलाच असला पाहिजे, त्याची सत्ता कायद्यानें उर्फ शास्त्रानें मर्यादित असली पाहिजे, न्यायाच्या कामांत वस्तुस्थितीचा व वहिवाटीचा निर्णय पंचानींच केला पाहिजे आणि अशाच तऱ्हेची पद्धति आर्यधर्मशास्त्राची आहे असें त्यांचे म्हणणें होतें. अशा तऱ्हेची मतें हल्ली पुष्कळांची आहेत. परंतु अण्णासाहेब यांच्या लेखांत या विषयाची मांडणी कांही अपूर्व कोटिक्रमानें केलेली आढळते. मी म्हणतों त्याप्रमाणे अमक्याचें मत आहे अशा तऱ्हेनें त्यांनी इतरांचें मत आपल्या समर्थनार्थ घेतलेले क्वचितच आढळेल. त्यांचें प्रतिपादन, तत्त्वविचार, जुने शास्त्राधार, जुने कायदे, जुना इतिहास, आणि ऐतिहासिक पुरावा यांवरच. रचलेलें आहे. त्याकारणाने शास्त्रांतील तत्त्वांची ओळख त्यांच्या लेखावरून चांगलीच पटते. हे त्यांचें लेख जर प्रसिद्ध झाले तर कायदेपंडित आणि न्याय- शास्त्रज्ञ या नात्यानें अण्णासाहेबांची ओळख पुढील पिढीस उत्कृष्ट होईल.