पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वकीली. श्री अण्णासाहेब यांच्या चरित्रासंबंधी इतर गोष्टी सांगितल्यावर वकीली- संबंधी थोडेबहुत तरी लिहिणें अवश्य आहे. परंतु तितकेंच तें काम कठीणही आहे; कारण एक तर मला स्वतःला कायद्याचें ज्ञान नाहीं; व दुसरें असें कीं, त्यांनी कोर्टात जाऊन पद्धतशीर वकीली कधीं केली नाहीं. परीक्षा पास झाल्यावर, काय वर्ष सहा महिने हायकोर्टात गेले असतील तेवढेच. त्या वेळचा त्यांचा थाट, व कोर्टात काम चालविण्याचे कौशल्य ही सांगणारें विशेषसें कोणी आढळत नाही; परंतु जर त्यांनी काम केले असते तर महादेव चिम- णाजीप्रमाणेच त्यांचेही नांव झाले असतें, हें खास. हायकोर्टात जाण्यापुरता इंग्रजी फुल् ड्रेस घालावा, व घरीं येतांच तो काढून ठेवावा, इतका त्यांना त्या पोषाखाचा तिटकारा होता. तरी पण ते त्या सर्व थाटानिशीं हायकोर्टात जात. त्यावेळेस वरोवर त्यांच्या नांवाचे चांदीचे मिले असलेले दोन पट्टेवाले व पुस्तकांचा गठ्ठाही असेच. परंतु असे फार दिवस चाललें नाहीं. हायकोर्टात वकीली करून पैसा मिळवावा, इकडे त्यांचे मुळीं लक्षच नव्हते. त्यांस लोक- संग्रहाचा व शिक्षणाचा मोठा व्याप करावयाचा होता, तिकडेच त्यांचें तन- मनधन गुंतलेलें होतें. म्हणून पूर्वी सांगितल्याप्रमाणें सालरजंग प्रकरणांत गुंतून ते मद्रासला गेले. तेथून ते कसे पालटून आले, वगैरे हकीकत पूर्वी आलीच आहे. त्यानंतर स्वतः त्यांनी कधीं कोर्टात पाय ठेवला नाहीं, अथवा घरी बसून देखील धंदा म्हणून वकीली कधी केली नाही. अर्ज लिहिणे, अपीलें करणें, हरप्रकारचा वकीली सल्ला देणें, वगैरे कामें थोडींबहुत त्यांची अखेरपर्यंत चाललींच होतीं. आणि अशा किरकोळ कामांवर त्यांनी कधीं पैसाही मिळविला नाही. परंतु सुदैवाने त्यांच्या उत्कृष्ट लौकिकामुळे संस्था- निक व धनिक अशा लोकांची कामे त्यांच्याकडे आली, आणि त्यामुळे त्यांस

  • वस्तुतः हा लेख दुसऱ्या खंडांतच यावयाचा. पण या विषयावर रा.

बाबासाहेब यांचेकडून थोडें लिहून घ्यावें ही कल्पनाच आमच्या डोक्यांत फार उशीरा आल्यामुळे तो येथे द्यावा लागत आहे. खं. ४... ९