पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीमंत बाळासाहेब नातु. बाळासाहेब नातु हे इतिहास प्रसिद्ध बाळाजीपंत नातू यांचे वंशज. श्रीमंत तात्यासाहेब रायरीकरांच्याप्रमाणेच याही पुरुषाच्या मनास पूर्वजांच्या कृतीचें मोठें दुःख होत होते. यांचा स्वभाव बाणेदार व तेजस्वी होता. आणि स्वधर्माभिमानही चांगलाच होता. पुण्यांत त्या वेळेला सुधारणेचीही लाट उसळली होती. तिच्या विरुद्ध पक्षाचे पुढारीपण बाळासाहेबांकडे होते बाळासाहेब आणि अण्णासाहेब यांचा यामुळेच मोठा स्नेह होता. व बाळासाहेबांच्या मनांत अण्णासाहेबांच्याविषयीं फार पूज्यबुद्धि होती. प्लेगच्या साली जेव्हां बाळासाहेबांस सरकारनें अटकेत ठेविलें तेव्हां त्यांच्या सुटकेकरितां अर्ज करण्याचें काम अण्णासाहेब यांचेकडे आलें. एका अर्जावरून बाळासाहेब सुटतील असें कांहीं कोणास वाटत नव्हते. परंतु अर्ज जातांच एका पळाचाही विलंब न करितां सरकारने बाळासाहेबांस जे तडकाफडकी सोडून दिले ते पाहून सर्वांसच आश्चर्य वाटलें. अर्जात एवढें अण्णासाहेबांनी लिहिलें तरी काय होतें, हे विचारण्याकरितां दाजीसाहेब खरे तर लागलेंच अण्णासाहेब यांचेकडे आले होते असे प्रत्यक्ष माहितीवरून समजतें. राजकीय कैद्यासंबंधी दुसऱ्या जेम्स राजाच्या वेळचा कोठलासा एक कायदा नजर चुकीनें रद्द करावयाचा राहिला होता. नेमका तेवढय़ाचाच उपयोग करून अण्णासाहेब यांनी बाळासाहेबांस सोडविलें. बाळासाहेबांचा व यांचा एवढा स्नेह असतांही अण्णासाहेबांनी त्याचे येथे पाण्याचा एक घोटही कधीं घेतला नाहीं. आणि धन्य बाळासाहेबांची कीं, त्यांनींही त्याबद्दल मनांत कर्वीही विषाद धरला नाहीं. शहाण्णव साली साता- न्यास प्राव्हिशिअल कान्फरन्स झाली होती. तिला बाळासाहेब व अण्णासाहेब दोघेही गेले होते. बाळासाहेब यांच्या कंपूतच अण्णासाहेब होते. परंतु ते कांहीं खात नसत नुसतें दूध पीत. तेव्हां बाळासाहेब यांनीं एकदां त्यांना विनंति केली कीं, आपण खात कां नाहीं ? चला तुम्ही आम्ही बरोबर बसून जेऊं, अंगावरचें उपरणे त्यांच्या पुढे टाकून अण्णासाहेब म्हणाले की, आनंदाची गोष्ट आहे. न जेवावयास काय झालें; पण माझी एक अट आहे. हें उपरणे घ्या व चार घरीं माधुकरी मागून