पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीकंचिस्वामी. , मद्रासेस जावयास निघाले त्यावेळी अण्णासाहेव यांस महाराजांनी ' येतांना कंचीस जाऊन ये, म्हणून सांगितलें होतें. परंतु तें कशाकरितां वगैरे कांहींच खुलासा केला नव्हता. पुढें ज्या वेळेस कंचीच्या महाराजांसह अण्णासाहेब परत आले, व श्रीमहाराजांचे दर्शनास गेले, त्यावेळी महाराजांनी रामचंद्र- अय्यांचा ' हा दक्षिणेतला अगस्ति आहे,' असे म्हणून मोठा सत्कार केला, व त्यांनीही 'आतां आमची जवाबदारी संपली, आपला माणूस सांभाळा, म्हणून महाराजांना सांगितले. तेव्हां कुठें त्याचा संदर्भ लागला. महाराजांनी दिलेल्या विशेषणावरून श्रीरामचंद्रअय्या म्हणजे केवढे जाडें प्रस्थ असावें हैं लक्षांत येतें. हे गृहस्थ वर्णानें काळेकुट्ट व शरीरानें सुदृढ होते. त्या काळच्या पद्धतीप्रमाणें अवश्य ती वेदविद्या व संस्कृत भाषा ही त्यांना येत असे; परंतु त्यांचे भाषण इतकें कमी असे कीं, कांहीं ठराविक द्राविडी शब्दांपली- कडे त्यांना कांहीं येत असावें, अशी देखील शंका कोणास यावयाची नाहीं. एक पंचेवजा नेसतें धोतर, डोक्यास एक फर्द गुंडाळलेलें, आंगावर एक लहानसा पंचा, एवढा काय तो त्यांचा पोषाख असे. श्रीविष्णुकंचीच्या विष्णुमूर्तीची उपासना ते करीत. सबंध महाराष्ट्रांत ज्याप्रमाणे पंढरीचे श्रीपांडुरंग, त्याच- प्रमाणे त्या टापूंत कंचीचे श्रीवरदराज, ही वैष्णवांची माउली आहे. आदरानें, प्रेमानें, सलगीनें इतकेंच काय तर अवहेलनेनें ज्याप्रमाणे पांडुरंगास अनेक प्रकारांनी आळवण्यांत येतें, तशाच सर्व भावांनी श्रीवरदराजांची उपासना करण्यांत येते. अण्णासाहेब यांच्या घटसर्पाचे प्रसंगी रामचंद्रअय्यांनी 2 वरदडा ( वर द्या. ) म्हणून त्यांची संभावना केलेली वाचकांच्या लक्षांत असेलच, आणि त्या एकंदर प्रसंगावरून व मार्गे दिलेल्या नैवेद्याच्या गोष्टीवरून यांचा अधिकार किती मोठा होता हैं लक्षांत येईलच. नित्य एक लक्ष नामस्मरण करून श्रीवरदराजास तुळशीची लाखोली वाहाण्याचा त्यांचा नेम असे. स्वतः ते श्रीवरदराजाची कानगी गोळा करण्याकरितां नेहमी फिरत असत. व मधून मधून कंचीस येत. तरी पण त्यांचा नियम अखंडित चाले, कंचीस त्यांनी एक तुळशीची बाग लाविली होती व देवळांत वेदाभ्यासा- खं. ४... ८ 6