पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डेक्कन कॉलेजांतील त्यावेळचे प्रोफेसर. २१ अण्णासाहेबांचें उच्च शिक्षण डेक्कन कॉलेजांत झालें, व स. १८६८ त बी. ए. ची परीक्षा पास होऊन पुढील शिक्षणाकरितां व आपल्या सर्व आकां- झांना प्रत्यक्ष स्वरूप देण्याकरितां ते मुंबईस गेले. डेक्कन कॉलेजमध्ये असतांना यांचा प्रसिद्ध केरूनाना छत्रे यांच्याबरोबर शिष्य या नात्यानें संबंध जडला, आणि तो पुढें तसाच कायम होता. नानांचा त्यांचेवर अत्यंत लोभ असे. त्यांचे वर्णन अण्णासाहेब फार प्रेमानें करीत असत. त्या वेळच्या डेक्कन कॉलेजां- तील विद्यार्थ्यांच्या व प्रोफेसरसाहेबांच्या हकीगती देखील अशाच प्रेमानें ते सांगत असत. वर्डस्वर्थ वगैरेचें सौजन्य व योग्यता सांगतांना त्यांना पोटांतून संतोष होत असे, पण त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानासही कधीं धक्का बसला नाहीं. कीलहॉर्नसाहेब संस्कृतचे प्रोफेसर म्हणून नुकतेच आले होते. एकदां कांहीं एका शब्दावरून प्रश्न निघून तो Obsolete म्हणजे अप्रयो- जक असल्याचें त्यांनीं सांगितले. त्यावरून तेथल्या तेथेंच उठून अण्णासाहेबांनी सांगितले की, 'आपण चुकत आहां, There is no such thing as obsolete in Sanskrit, ' यामुळे चिडून जाऊन कीलहॉर्नसाहेबांनी मोठाच वाद घातला, व 'आम्ही पद्धतशीर इंग्रजी शिकलेले असल्यामुळे इंग्रजी व संस्कृत या दोन्हीही भाषांत तुम्ही आमच्या मानानें अजाण आहां,' असें कीलहॉर्नसाहेबांस स्पष्ट सांगण्यापर्यंत वेळ आली. याच वेळी वस्वर्थसाहेब खोलीवरून चाललेले होते, तेही गडबड ऐकून आंत आले व त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करून अण्णासाहेबांस गप्प बसविलें व कीलहॉर्न यांस क्लास संपवून भेटण्यास सांगितले. मागाहून त्यांनीं अण्णासाहेबांची समजूत घातली कीं तुझें म्हणणे बरोबर आहे, परंतु कांहीं झालें तरी कीलहीर्न प्रोफेसर आहेत, त्यांचा मान ठेवला पाहिजे; व कीलहॉर्न यांस स्पष्ट सांगितलें कीं ' ही मुले म्हणजे केवळ बृहस्पति होत, यांच्याशी वाद घेत जाऊं नकोस.' डेक्कनमध्ये असतांना प्रसिद्ध आबाजी विष्णु काथवटे हे यांचे सहाध्यायी होते. उभयतां एकाच खोलीत राहत असत, व हूडपणाच्या सर्व प्रकारांत सामील होत असत. एकदां नानांनी स्वतःच्या उपयोगाकरितां म्हणून ३५-४० लाड- वांचा एक डबा आणून कोठें तरी भिंतीवर ठेवला होता. त्यावर नजर जाऊन अण्णासाहेबांनी तो खालीं काढला, व आंतील माल फस्त करून आंत धोंडे भरून ठेवले ! नानांना ही चोरी उघडकीस आल्यावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांस