Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ श्रीनरसिंहसरस्वती महाराज. संबंध 'लठ्ठालठ्ठी'चा होता, परंतु महाराजांच्या विषयी एवढी पूज्यवुद्धि होती की श्रीमंती थाटानें कधीं त्यांच्या समोर गेले नाहीत. गेल्याबरोबर आधीं खालीं रेशीमकाठी धोतर सोडून ठेवावयाचें, व साधी वस्त्रें परिधान करून महारा- जांसमोर जावयाचें असा परिपाठ होता; व बहुतकरून इतर कोणासमोर त्यांचें व यांचे भाषण होत नसे, व इतर लोकांच्या दृष्टीस यांची 'लठ्ठालठ्ठी' तेवढीच पडे. त्यामुळे यांच्या संबंधाचें खरें स्वरूप पहिल्यापासूनच काय होतें, याविषयी चांगल्या सांप्रदायिकांतही मोठे गैरसमज आढळून येतात. पुण्याची गंमत अण्णासाहेब सांगत असत, की, पुराणास येणारे लोक बहुतकरून नुसते माना हालविणारेच असावयाचे. व महाराजांच्या वास्तविक स्वरूपाकडे कोणा-. चेही लक्ष नसावयाचें. एकदां कांही सांगितल्यावर महाराजांनी यांना विचारले दादा, काय समजलें ? ' त्यावर अण्णासाहेब यांनों जवाब दिला ' दोन गोष्टी कळल्या; एक तर कांहीं समजत नाहीं हें समजलें, व दुसरें समजलें म्हणून माना डोलविणारे हे सारे लोक किती लवाड आहेत, ते लक्षांत आलें.' त्यावरून रागावल्यासारखें करून महाराजांनी त्यांना पुराणांस येण्याची व बोलण्याची मनाई केली. अण्णासाहेब सांगत 'अशी मौज नेहमींच चाले. त्यांनी पुराणास येऊं नको म्हणून म्हणावें, दोन दिवस आपण जाऊं नये, मग 'कां येत नाही' म्हणून त्यानींच चौकशी करावी, तेव्हां 'दादाला आतां पुराणास येऊं द्या, तो आतां मधे मधे बोलणार नाहीं,' अशा तऱ्हेची मध्यस्थी तात्यासाहेबानीं करावी; परंतु पुराणास गेले की दोघांचा कांहींना कांहीं वाद व्हावाच,' असें ते नेहमी सांगत. ही लठ्ठालठ्ठी अर्थातच वरवर होती. " 66 महाराज आळंदीस एकंदर १२ वर्षे राहिले, व तेथें त्यांनी अनेक चमत्कारही केले. त्यांतील ११२ चमत्कारांचा उल्लेख मागें केलाच आहे. भिकान्यासारिखा स्वरूपें । उदंड करी गुप्तरूपें । 29 अशी त्यांची वृत्ति होती; फरक एवढाच कीं राहणी रंगेल व थाटामाटाची त्यांच्याविषयीं चमत्कारिक ग्रह असलेले लोकही आढळत. त्यांच्या १२ वर्षांतील समग्र लीला ५१४ पानांत सांगणे शक्य नाही. त्याच्याकरितां अक्कलकोट स्वामींच्या चरित्रासारखे वेगळें चरित्रच लिहिले पाहिजे. ब्रह्मसमंधास मुक्ति देणें, एका रात्रींतून २०/२५ हजार पान जेऊं घालणें, एकाच वेळी अनेक ठिकाणी असणे, मृतसंजीवन त्याच्यामुळे असे. पुष्कळ 0