पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुण्यांतील शिक्षण. ज्ञात्वा समस्तयवनागमतत्वमादौ दृष्ट्वा तदीय कुटिलात्रपराजनीतिम् । स्वीयानसारमिति दर्शयितुं तदेव योऽभूत् स्वयं विगतनायक आत्मदेवः ॥ हगील त्रोटक विवेचनावरून सहजच लक्षांत येतें कीं, अण्णासाहेबांचें मागी बाळपण व कौमार्य यांचा इतिहास अतीशय मनोरम असला पाहिजे; परंतु माहितीच्या अभावीं, तो समजण्याची आपली इच्छा दाबून टाकणें भाग आहे. प्रसंगाशिवाय मुद्दाम आपण होऊन एकादी गोष्ट सांगणे अण्णासाहेबांस शक्य नव्हतें, व त्या वेळची माहिती असणारी माणसें व त्यांचे समवयस्क स्नेहीमंडळ यांपैकी आज कोणीही हयात नसल्यामुळे, हा सर्व भाग गाळू टाकून, पुढे जाणे भाग आहे; आणि पुढेदेखील क्रमशः अथवा संगतवार माहिती सांगतां येईल असे नाहीं. तरी पण होतां होईल तो व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अण्णासाहेबांच्या हायस्कूलमधील कारकीर्दीसंबंधानें विशेष माहिती नाहीं.. वस्तुतः हा काळच त्यांच्या आयुष्यांत एका तऱ्हेने फार महत्त्वाचा असला पाहिजे. त्या वेळची पुण्याची परिस्थिति, पारतंत्र्यांत वुडून गेलेल्या लोकांचा अधःपातास जाण्याविषयींचा अट्टाहास, दोन संस्कृतींचा नुकताच सुरू झालेला झगडा, व त्यामुळे उत्पन्न झालेले समाजांतील भिन्न भिन्न वर्ग, त्यांची नाना- प्रकारची मतें वगैरे सर्व गोष्टींचे यथायोग्य परिणाम अंतःकरणावर होऊनच त्यांची मनोरचना बनली असेल. या काळाचें सामान्य चित्र रा. नरसोपंत केळकर यांनी लिहिलेल्या टिळकचरित्राच्या पहिल्या खंडांत पहावयास मिळतें.. त्याची पुनरुक्ति न करितां एवढेच म्हणतां येईल की, सामान्यतः असा जो एक समज आहे कीं, अण्णासाहेब हे एककल्ली विक्षिप्त पुरुष होऊन गेले, तो अतीशय चुकीचा असून, सर्व त-हेच्या नव्याजुन्याच्या झगड्यांतून स्वतः बाहेर पडल्यानंतर, प्रत्यक्ष अनुभवानें त्यांची मतें बनली होती. या अंतःकरणाच्या वाढीस कोणापासून कशी कशी मदत झाली, आणि कोणच्या कोणच्या प्रसंगांनी