पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क्षमतेंतच खरी समता. थोड्या श्रमांत पुष्कळ वेळपर्यंत अबाधीत चैन कशी चालावी, या एका ध्येया- प्रीत्यर्थच धडपडत असल्यामुळे, इंद्रियसुखाच्या आड जें जें येईल तें तें दूर करण्यापलीकडे तिच्यापुढे दुसरा विषय नाहीं; आणि विषयोपभोग हा त्यांत. जोडीदार असल्याखेरीज खरोखर सुखकारक कर्धीच होत नाहीं. म्हणून त्यांच्या समतेच्या कल्पनेमध्यें सहपान सहभोजन इत्यादिकांना फाजील महत्व आलें. आमच्या इकडे ' वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता' हेंच मुळीं शहाणपणाचें लक्षण ठरल्यामुळे हें साध्य करण्याचे माणसाच्या उपाधि आणि प्रकृति यांस अनुसरून अनेक मार्ग झाले, आणि त्यामुळे समता न बिघडतांही अनेक प्रकारची विषमता उत्पन्न झाली. त्यामुळे एकमेकाच्या गळ्यांत गळा घालणे, आणि एकमेकाचें उष्टें खाणे असा समतेचा संकुचित अर्थ आमच्या इकडे कोणाच्याही डोक्यांत येत नाहीं. उलट प्रेम आणि समता यांत काडीइतकेंहि न्यून न येतां आईच्या हातचें मुलानें, आणि एका भावांस चालणारें अन्न दुसऱ्यानें न खाण्याइतकी क्षमता उत्पन्न झाली. अशा दृष्टीने पाहिलें तर स्त्रिया आणि शूद्र यांसही समाजांत बाकीच्या इतकाच समान हक्क ठेवला होता. ४७ पूर्वी चातुर्वर्ण्यावरील विवेचनांत सांगितलेंच आहे कीं ब्रह्मविद्या आणि ब्रह्मप्राप्ती या परम ध्येयाची प्राप्ती करून घेण्याची कोणासच मनाई नव्हती. इतकेच नव्हे, तर ती “ याचि देहीं याचि डोळां " प्रत्येकाच्या वाट्यांस कशी येईल, हाच प्रश्न समाजरचना करणाऱ्या ऋषींच्या पुढे होता. कारणपरत्वें स्त्रियांच्या स्वभावाविषयीं आणि चारित्र्याविषयीं अत्यंत कठोरसे विचार उत्तर वाङ्मयांत आलेले आहेत, आणि त्या मूर्ख, अज्ञानी व 'अनृतं साहसं माया' इत्यादि स्फोटक द्रव्यांनी भरलेल्या बांबगोळ्या आहेत, असे म्हटलेले असले तरी, त्यावरून स्त्रियांच्या संबंधानें शास्त्रकारांना कांही जबाबदारी वाटत नव्हती, अथवा त्यांच्या संबंधाची पीडा कशी तरी टाळावयाची होती, असे नाहीं. स्त्रियांच्या अनुदारपणासंबंधीं शास्त्रकारांवर मुख्य आरोप असें करण्यांत येतात कीं, ( १ ) स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षां सर्व तऱ्हेनें हीन कोटीच्या असून त्यांच्या अंगीं, पुरुषांस कल्याणकारक असणाऱ्या गोष्टींपेक्षां घातुक होणाऱ्याच गोष्टी जास्त आहेत; ( २ ) त्या जात्याच अतिशय कपटी, असत्यप्रिय, निर्दय, धूर्त आणि साहसीं आहेत; ( ३ ) स्वभावतःच त्यांची प्रवृत्ति पापा-