Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र ' व मानववंश. संस्कृतप्राय होऊन त्यांच्या भाषा संस्कृतोत्पन्न वाटण्यासारख्या झाल्या, तरी मूळ त्यांच्या प्रकृती भिन्न आहेत. पैकीं द्रवीड मानववंश विस्तृत असून पृथ्वीवर पुष्कळ ठिकाणी पसरलेला होता असे त्यांचे मत होतें. * ग्रीक लोक ही मूळचीं तामीळ वसाहत असून ग्रीक भाषेचें मूळ तामीळ भाषेत सांपडतें. त्याचप्रमाणें रोमन लीक व त्यांची भाषा हे मूळ द्राविडी होत. 'लॅटिन' शब्दच मुळी द्राविडीय आहे. द्राविडी भाषेत तेलगु हा शब्द 'तेनेगी' असा आहे. 'तेने' म्हणजे मधुर आणि संस्कृत ' गी' म्हणजे वाणी यांच्या मिश्रणानें द्रविड लोकांच्या स्वभाषेच्या अभिमानाचे द्योतक असा हा शब्द बनला. तेनेगी म्हणजे मधुर भाषा, इंग्लीश Honey शब्द या तेनेचाच वंशज आहे. तेलगु भाषेत 'लात ' म्हणजे '“मागचे ' असा शब्द आहे. तो लात ( इंग्लीश Late ) आणि तेनेगी यापासून ( लात तेनेगी ' म्हणजे मागाहूनची भाषा असा शब्द झाला. तेंच लॅटिन शब्दाचें मूळरूप आहे. आर्य लोकांच्या सहवासाने त्यांच्या भाषेमध्यें संस्कृताचें मिश्रण झाले आणि संस्कृताच्या लकबीही त्यांनी उचलल्या. तरी मूळ दोघांचेंहि अगदी वेग- 6 "

  • या कल्पनांस पुष्टि देण्याजोगे कित्येक शोध 'मोहेनजोडारो' व

हराप्पा ' येथील भूगर्भ संशोधनांत 'पुराणवस्तु संशोधक' खात्यास नुक- तेच लागले आहेत. ता० १०-१-२६च्या ' इंडियन डेली मेल' च्या अंकांत त्याची माहिती देऊन लेखक म्हणतो It may already be taken for granted that as branches of a common race, the popula- tions of North-West India and Sumer enjoyed a common civilisation at a time when the former was probably free from any admixture of of that Aryan Stock which now dominates its political complexion.

It will indeed be strange reversal of preconceived ideas should it proved that the magnificent civilisation of Baby- lonia, with all its art, literature, and economic excellence and its almost world--wide dominance, was infact due to the Dravidian tribes which in later years came to be sscciated with one of the lesser forms of civilhsation.'