Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाशास्त्र' व मानववंश. अर्वाचीन संशोधन पद्धतींमध्ये भाषाशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांना अति- शय महत्त्व आले आहे. संस्कृतभाषा व इतर कांहीं भाषा यांच्यांतील साम्यामुळे पूर्वी केव्हां तरी या भाषा बोलणारे लोक हे एकजातीय असून, त्यांची एक भाषा असावी, आणि या पूर्ववौदिक भाषेपासून आणि पूर्ववैदिक अथवा वैदिक मानववंशापासून हल्लीचे हिंदु, इराणी, आणि युरोपिअन आर्यवंश निघाले आहेत, असा युरोपिअन पंडितांनी सिद्धांत केला आहे. काळाच्या अनंत पोटांत केव्हांतरी मानववंश एकजातीय असेल, नाहीं असे नाहीं. परंतु त्यांच्यांत पृथक् वंशत्व स्पष्टपणें सिद्ध होऊन आजच्या काळी मनुष्यजातीचा इतिहास लिहिणाराला ती गोष्ट भूमितींतील गृहितकृत्यांप्रमाणे धरावी लागते. आणि तशी ती धरली आहे, म्हणूनच या शास्त्रास महत्त्व आलें, अशा दृष्टीनें पाहतां आमचे वैदिक आणि इराणी आर्य व ट्युटानिक वगैरे आर्य म्हणविणारे युरोपिअन वंश हे मुळचे एकवंशीय नसून अगदीं भिन्नभिन्न अशा दोनवंशां- तून पुढे आले आहेत, असे भाषाशास्त्रदृष्टया श्री अण्णासाहेब यांचे मत होतें. स्वतः अण्णासाहेब यांस संस्कृत व इंग्रजी प्रमाणेच तामीळ, तेलगु, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, रशियन, जर्मन, पर्शियन यांचे चांगले ज्ञान होतें; आणि कानडी व अरबी यांचीं कामापुरती माहिती होती. कायद्याच्या दृष्टीनें, स्मृतिकारांचा फौजदारी कायदा हा अर्वाचीन कोणत्याही कायद्यापेक्षा जास्त पायाशुद्ध आणि परिणत आहे, आणि दिवाणी कायद्यासंबंधानेंही जवळ जवळ तसेंच दाखवितां येतें, अशा दृष्टीनें राजा व प्रजा यांच्या जमीनीवरील हक्कासंबंधी एका अपीलांत लिहीत असतां त्यांनी सुंदर विवरण केले आहे. असे करीत असतां, अर्थातच मानवंशाचा प्रश्न निघून भाषाशास्त्रदृष्टया त्याचें विवरण करीत असतांना या भाषाज्ञानाचा त्यांना उत्तम उपयोग झाला; आणि जरी पुढे त्यांना तो लेख पुरा करता आला नाहीं, तरी देखील हा विषय त्यांच्या मनांत अखेरपर्यंत घोळत होता व त्या संबंधाने मधून मधून त्यांना कांहीं तरी सुचत असे. संस्कृतांत केव्हां तरी शब्दाच्या सुरवातीस असलेला जोड ' सू' - जसें स्मृति, स्त्री, स्व वगैरे, हा वैदिक भाषेत केव्हांतरी नञ् द्योतक होता, असें ते सांगत असत; आणि त्यांवरून स्मृति ' म्हणजे मेलेला संस्कार " 6 ८