Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यज्ञाची मूळ कल्पना. २७ एक नवा कारखाना निघून विश्वाच्या उन्नतीस मदत झाली. त्यामुळे सर्व विश्वासच हा आनंद होतो. उत्क्रांतिक्रमांत केव्हांतरी निघणारे हे कारखाने जर आजच काढतां आले तर अर्थातच विश्वाच्या उन्नतीस मोठेंच साहाय्य होऊन, ती थोडीतरी लवकर होईल. स्वतःच्या योग आणि मंत्र इत्यादि साह्यांनी जर पशूच्या लिंग देहांतील या सर्व वीजभूत शक्ति प्रगट करून त्या देहाला मनुष्यता आणतां आली, तर हें कार्य अर्थातच साधलें असें होईल. अशा प्रकारें त्यांच्यातील शक्ती जागृत करून विश्वांतील त्या त्या शक्तींस त्यांची जोड घालून देणे हा खरा यज्ञ, आणि याचेंच नांव आहुति देणें. सर्व वैदिक संस्कृतींच्या अत्यंत परिणतावस्थेत मूळ हा यज्ञ उत्पन्न झाला, आणि हळू हळू जसजशी माणसाची योगशक्ति कमी कमी होत गेली, तसतशी त्याची विकृत स्वरूप होत होत पुराणांत दिसणाऱ्या केवळ मांसाशनरूप यज्ञापर्यंत त्याची रूपांतरें झालीं. आणि यज्ञाचा मूळ हेतु व त्यांतील मांसाशन हैं मांसाशन कसें होत नाहीं, हे विसरून जाऊन पुढील वाजायांत आणि आचारांत मांसाशनाची माल परंपरा राहिली. यज्ञयागाचा उल्लेख टाकला तर ऋषि या अपार्थिव कोटींतील व्यक्तीखेरीज इतर ब्राह्मणांनी मांस खाल्ल्याचे उल्लेख नाहींत. आणि क्वचित् कोठें जे आलेले आहेत, ते अशा चुकीच्या समजुतीनें व मांसलोलुप लोकांनी आपल्या मता- च्या पुष्टथर्थ केलेले आहेत. येथें हेंहि सांगणें जरूर आहे की, संस्कृत वाजाय हैं संस्कृतीच्या अवस्थांतराच्या वेळीं निरनिराळ्या संस्करणांतून गेलेले आहे. आणि त्यामुळे तें जसेच्या तसें राखून ठेवण्याचे जरी भगीरथ प्रयत्न करण्यांत आले तरीही प्रक्षेप, विक्षेप, पाठभेद वगैरे सर्व दोषांपासून तेही अलिप्त राहिले नाहीं, असें अण्णासाहेब यांचें मत होतें. मात्र प्रक्षेप, विक्षेप, पाठभेद अध्यायांची व श्लोकांची अदलाबदल मूळ कल्पनेचा लोप झाल्यामुळे स्वतःच्या तात्पुरत्या कल्पनांनी लावलेली संगति, आणि सोडविलेली प्रमेयें इत्यादि दोषां- तून मूळ रहस्य चाळून घेण्याची त्यांची चाळणी मात्र भाषा, ऐतिहासिक उल्लेख वगैरेची अगदींच उपटसुंभ नसून, वैदिक संस्कृतीचे जे हृद्गत म्हणून सांगि- तलें त्याची होती. भाषा वगैरे पद्धतीची चाळणी अनुगमावस्थेतील (Induc- tion ) संशोधनास उपयोगी पड़ते. कारण तेथें सत्यासत्यता ठरविण्याला निश्चित अशी कसोटीच नसते. परंतु जेथें एका महासिद्धांतापासून अनेक