पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ श्री अण्णासाहेबांचें लग्न. मुलानें सांगितलें, कीं साहेब बहादुरांनी Nonsence, next म्हटलेंच. शेवटी जेव्हां कोणासच नीट ( ! ) उत्तर देतां येईना, तेव्हां मास्तरसाहेबांच्या 'स्वारीनें स्वतःच त्याचें उत्तर सांगितलें:-' इतका सोपा येत नाहीं ? "एका मिनि- टाचा उशीर की बोबी मरलाच होता ! ! ' यांची आई यांच्या लहानपणींच, म्हणजे हे सुमारें दहाबारा वर्षांचे असतां वारली. अण्णासाहेब यांचे पाठीवर तिला लागलाच म्हणजे सुमारें २।३ वर्षांनी एक मुलगा झाला. त्याचें नांव नारायणराव असे होतें. म्हणून त्यांना नानासाहेब असे म्हणत असत. अण्णासाहेब यांस त्यांची बहीण बाळ म्हणत असे. श्रीमन्नृसिंव्हसरस्वती महाराज, धुळ्याचे श्रीपद्मनाभस्वामी ऊर्फ वुवासाहेब वगैरे "दादा म्हणत, आणि इतर सर्वत्र अण्णासाहेब म्हणत असत. आईचें सुख यांना कांहीं फार दिवस लाभले नाही. परंतु जाण्यापूर्वीच तिनें श्री गुंडगजान- नाची व यांची गांठ घालून दिली होती. श्रीगजाननाला जाण्याचा व प्रदक्षि- णेचा क्रम सात वर्षे वयापासूनच यांना घालून दिला होता. आईनें जाण्यापूर्वी आपण जाणार म्हणून सांगून ठेवले होतें. आई निवर्तल्यावर लवकरच यांचे लग्न झाले. शुक्रवारांत लोणीविके दामले म्हणून प्रसिद्ध होते, ( अजूनही या नांवानें प्रसिद्ध आहेत, परंतु कालमहात्म्यानें घराची ती स्थिति राहिली नाही. ) त्यांची मुलगी रमाबाई. असे सांगतात की, मुलगी पसंत केल्यावर भाऊसाहेब यांस कोणी सांगितलें कीं ती काळी आहे. तेव्हां ते म्हणाले 'जरा हळद लागली कीं, दिसेल गोरी !' खरोखरच अण्णासाहेब यांच्या सौंदर्याच्या - मानानें त्यांच्या पत्नी दिसावयास काळ्यासांवळ्याच होत्या. परंतु नाकाडो- ळ्यांनीं नीटस असून स्वभावानें तर अतीच चांगल्या. ज्याचें आयुष्य पुढें इतक्या चमत्कारिक रीतीनें जाणार होतें, अशा मुलाकरितां भाऊसाहेबांनी एकाद्या श्रीमंत सरदाराची मोत्याच्या दाण्यासारखी मुलगी न करतां रूपानें साधारणच परंतु स्वभावानें लोकोत्तर मुलगी पसंत केली, यांत त्यांच्या धोरणी- पणाची व मनुष्यस्वभावाच्या परीक्षेची कमाल दिसून येते. या वेळच्या अण्णासाहेबांच्या तल्लख स्वभावाची एक गोष्ट सांगतात. लग्ना- नंतर लवकरच पुढें रंगपंचमीचा सण आला. त्यावेळी तो सण सासुरवाडीस झाला. तेव्हां मागाहून अंगावर टाकण्याकरितां रंग आला. यांना असल्या गोष्टीची -मनापासून चीड असल्यामुळे 'तसे करूं नका,' म्हणून त्यांनी निक्षून सांगितलें.