वाणीचे दोन प्रकार. Soul called consciousness, and also to teach the ways by which the several powers etc. can be generated and manifested independantly of the outer world. हें कसे घडून येईल, आणि त्याची परंपरा नित्य कशी टिकेल, असा दूरवर विचार करून जी समाजरचना केली, तिचें नांव चातुर्वर्ण्य. श्रमविभाग हें या संस्थेचें रहस्य नसून आपआपल्या परीने सर्वोपयोगी असे श्रम शक्य तितके जास्त आणि चांगले कसे करतां येतील, हें या संस्थेचें रहस्य आहे. ७ अनेक प्रकारचे प्रयोग केल्यावर त्यांना असे आढळून आले की या विश्वो- त्पत्तीच्या मूलस्थानी सर्वत्र ध्वनीच असून आणि हें विश्व त्या ठिकाणीं अभेद- रूप होतें. व्यक्ततेला आरंभ झाल्याबरोबर हा ध्वनीच जसजसा जास्त स्पष्ट होऊं लागला, तसतसा त्यास मर्यादितपणा येऊन तो साकार आणि सरूप दिसूं लागला. म्हणून ध्वनी आणि हें साकार सरूप विश्व हीं परस्परांचीच वेगळी वेगळी रूपें आहेत; आणि म्हणून नाम आणि रूप, अथवा पद म्हणजे शब्द आणि त्याचा अर्थ म्हणजे वस्तु, हें द्वंद्व अस्तित्वांत आलें. अर्थातच यांचा जन्यजनकसंबंध आहे. बाह्यवस्तूंतून ध्वनी आणि ध्वनीपासून बाह्य वस्तु निर्माण होते, म्हणजे त्यांचे एकमेकांत रूपांतर करतां येतें. एवढेच कीं बाह्यवस्तूचा मूलस्थानीय ध्वनी कोणचा हें नक्की कळले पाहिजे. व्यवहाराकरितां मानवी संकेतानें निरनिराळ्या भाषारूप जे ध्वनी ठरविले जातात ते अर्थातच नाम आणि रूप यांच्या या मूळ संबंधास अनुसरून नस- तात. म्हणून ते पालटतात आणि भाषापरत्वे त्याच वस्तूचे द्योतक असे अनेक संकेत होऊं शकतात. परंतु शब्द आणि अर्थ यांचा जो हा सृष्टीतील संबंध तो स्वयंभू असून कोणी केलेला नाही, आणि कोणास तो पालटतां येणार नाही. म्हणून तो नित्यसिद्ध अखंड आणि चिच्छक्तोनें युक्त असा आहे. परंतु मूलस्थानीय ध्वनि या मानवयंत्रांतून बाहेर पडतांना, या यंत्राच्या क्षमतेप्रमाणे ५२ मातृ- कांचे स्थूल रूप घेऊनच बाहेर पडणार आणि त्यामुळे मनुष्याच्या वाचेनें होणाऱ्या उच्चारांत संकेतकृतभाषा व एकाद्या वस्तूचे हे मूलध्वनि मूलस्थानीं उत्पन्न होतील असे कांहीं उच्चार, त्या वस्तूसंबंधानें उत्पन्न होतील, मग हा संबंध त्यास कळो अथवा न कळो. ही जी दुसऱ्या प्रकारच्या उच्चारांची भाषा तिलाच वेद अथवा छंद ( म्हणजे गूढ अथवा झांकून टाकणारी ) आणि
पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३१९
Appearance