पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हनुमंतभक्तांनो त्वरा करा ! श्री. गोरेगांवकर्स बिल्डिंग चाळ २, मजला ३ रा, खोली नंबर ५६ गिरगांव मुंबई नंबर ४. बलभीमभक्तांनो त्वरा करा !! श्रीहनुमंतलीलामृत. प्रथम कुसुम. हा हनुमंतभक्तांचा अत्यंत आवडता ग्रंथ आहे. यांतील कथाभाग वाल्मीकिरामायणाच्या बाहेरचा असून अत्यंत मनोवेधक असा आहे. श्री- मारुतीराया संबंधाचा काव्यग्रंथ याखेरीज दुसरा महाराष्ट्र भाषेत उपलब्ध नाहीं. श्रीहनुमंतभक्त व परंपरेनें समर्थ सांप्रदायिक मंडळींनी ह्या ग्रंथाची एक एक प्रत अवश्य संग्रही ठेवावी. या ग्रंथाचा आकार काउन षोडषपत्री पोथी आकाराचा असून पृष्ठे २०० आहेत. किंमतही फारच स्वल्प म्हणजे १ रुपया आहे. टपालखर्च वेगळा पडेल. प्रती फारच थोड्या शिल्लक आहेत, तरी श्रीवलभीमभक्तांनीं व सयर्थसांप्रदायिक मंडळीनी त्वरा करून मागणी करावी. कृष्णाजी वामन तलवलकर.