Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्यकी. अण्णासाहेब यांच्या इतर सर्व गोष्टींप्रमाणेच त्यांची वैद्यकी ही ही लोकांस एक मोठें कोर्डेच होतें. त्यांचें तें निमित्ताला हात पाहणे, वेळेस शंभर शंभर माणसांचे हात आधीं भराभर पाहून, मग क्रमानें औषधें सांगत सुटणें, आणि रोगाचे निदान व त्याची उत्पत्ति यांविषयांच्या विलक्षण वाटणाच्या उपपत्त्या, हें सर्वच कांहीं विलक्षण होतें. बरें, चिकित्सा म्हणावी तर तेही असलेच विलक्षण खटलें होतें. मोठा धन्वंतरी म्हणून अतिशय उत्कंठेने त्यांचेकडे जावें, व कांहीं तरी मोठें औषध ते आपणास देतील, अशी आशा करावी, तो कोठें सैंधव आणि ओंवा, अथवा मिरपूड आणि जिरेपूड असलें कांहीं तरी दीड- दमडीचें औषत्र त्यांनी घेण्यास सांगावें. अण्णासाहेब यांच्यासारखा सव्य- साची भिषग्वर आणि त्याच्यापाशी ही असली वैदूगिरी ! आणि ती औषध- योजना तरी काय ? आगगाडीच्या डब्यांप्रमाणे एंजिन आणि ब्रेकसारखें गुळ- वेल आणि कडूनिंबाची पानें प्रत्येक योजनेच्या आदिअंती असावयाचींच ! व मधे मात्र एरंडमूळ, पांढया वसूची मुळी वगैरे डबे जरूरीप्रमाणे कमजास्त असावयाचे. त्यांतल्या त्यांतही सुंठ, धमासा इत्यादि ठराविक औषधें, सेकंड- क्लास इंटरसारखी मध्यंतरी असलींच पाहिजेत. पांच पन्नास रोगांची चिकित्सा काढून पाहिली तर या असल्या औषधांतून उगीच कुठें दोनचार औषधांचा किरकोळ फरक असावयाचा. याला काय वैद्यकी म्हणावयाचें ? तसेंच तें पथ्य तरी काय कडक ! चहा, कॉफी आणि मिसळभजी यांना चटावलेल्या जिभेला तर तें एक भयंकर दिव्यच होतें. चांगल्या निग्रही माण- साला देखील साधारण मोठ्या रोगांत या सर्व उपाययोजनेने बरा होणें, म्हणजे, पांडवांच्या अज्ञातवासांतून पार पडण्यापेक्षांही कठीण. त्यामुळे चांगले चांगले विद्वान् लोक देखील " अण्णासाहेब यांच्या योजनेंत औषधपणा काय आहे, त्यांच्या कृपेचीच जास्त किंमत, व तेवढ्याच करितां अण्णासाहेब यांचे- कडे जावें; एरवीं औषधांत कांही अर्थ नाहीं, " असे म्हणतांना आढळत. कित्येक वेळां असे आढळे कीं, उगीच दोनचार औषधांच्या फरकानें पांच पंचवीस रोग्यांनाही तेंच औषध ते सांगत. त्यामुळे अशीही समजूत झाली होती कीं, औषधें सांगतांना ते भानावरही नसत, आणि नादिष्टपणानें तोच