पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ 'साक्षात्परिचय ' मुळे, जगतांतील यच्चयावत् सृष्ट परमाणु, मग ते गोचर असोत अथवा अगो- चर असोत, एकमेकांस जसे कांहीं जगदी चिकटून आहेत, आणि म्हणूनच आमच्या किंचित् दृष्टीस जरी दिसत नाहीं, तरी जें काय त्यांचें बरें वाईट व्हावयाचे आहे, तें सर्वांचेंच परस्परांस धरूनच व्हावयाचे आहे, व पर- स्परांशी त्यांचा कर्मभोगरूप व्यापारविनिमय अखंड आहे, आणि म्हणूनच हें ओळखून, अहंकारविशिष्ट जीवानें आपल्या सर्व भोगकर्मांची रचना केली पाहिजे, हे त्यांचें साऱ्या वैदिक शिक्षेचें सार होते. व तें त्यांनी स्वतः तंतो- तंत आचरून दाखविलें, जेवावयास वसलेल्या लोकांची पाने काढण्यासारख्या गोष्टीपासूनही भोंवतालच्या मुलांना 'अरे, मी तुमच्यांतला, आपण सारे मिळून काम करूं, मला कांहीं तरी करूं द्या' असें त्यांचें शिकविणें होतें व अशा कांहीं कांहीं वेळीं श्रीभक्त सीतारामपंतांसारख्या एकनिष्ठ भक्तांनी त्यांनी काम करूं नये, म्हणून कितीही अट्टाहास केला, तरी तें न चालूं देतां पाणी वाढणें, पान उचलून टाकणें, शेणगोळा बाहेर टाकणे, अशा तऱ्हेचें कांही तरी काम, अगदी लहान कां होईना, पण केल्याखेरीज त्यांच्यानें राहवत नसे. 6 मनुष्यमात्राच्या ठिकाणों ईश्वराचें अस्तित्व पाहणें, व जेथें कोठें गरज असेल, तेथें अनुकूल ती सेवा करून संतोष देणे, व " करावें कर्म पितरांचें नामीं। समपीवें विष्णूस आम्हीं । " ( श्रीगुरुचरित्र ५ ) अशा रीतीनें प्रत्येक क्रिया महाराजांस चिकटून द्यावी, हे सर्व तपांहून मोठें तप आहे, व अशा रीतीनें एकाद्या अंतःकरणास झालेला संतोष, म्हणजे सर्व यज्ञांपेक्षांही महायज्ञ आहे, असे आपल्या सर्व कृतीनें निमूटपणें ते शिकवीत. एकदां एक साधारण वेडसरच असा प्राणी दुपारी ३४ वाजतांच येऊन उभा राहिला, व 'भूक लागली,’ म्हणून म्हणूं लागला. तेव्हां पान मांडून जे काय त्या वेळेला होतें, ते त्यांनी त्याच्यापुढे ठेविलें, व शिवाय वर दूध होतें, तेही आणून त्यास शिळ्या भातास दूध साखर घातली. जेवून तृप्त झाल्यावर त्या वेडप्याचे डोळे आनंदानें भरून आले. तो म्हणूं लागला कीं महाराज, आगेमागें कां होईना, व थोडेबहुत हाल होऊन कां डोईना, पोटास गोळा तर कुठे तरी मिळतोच. परंतु भात वाळलेला आहे म्हणून दूध साखर कोण घालणार ? तो त्याचा केवळ महाराजांचा ८५ दूध, संतोष पाहून त्यांना किती आनंद झाला, व बाकीचें