पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' साक्षात्परिचय ' महाराजांच्या तीर्थप्रसादाचा अवमान होऊं नये, म्हणून तर ते जपतच परंतु, तो सर्वांच्या पोटांत जावा, याची त्यांना इतकी कळकळ असे कीं, बहुत- करून ते आपल्याकडे येणाऱ्या सर्व लोकांस, इतकेंच तर काय, परंतु मांजर गाय, पोपट, इत्यादि जीवानांही तीर्थप्रसाद देत. एकदां त्यांना, 'पोपटास तुम्ही प्रसाद घालतां, त्याला त्याचें काय आहे ? त्याच्या ठिकाणीं काय श्रद्धा आहे ? असा प्रश्न केला होता. तेव्हां ते म्हणाले, 'त्याची नसेना ? आमची तर आहे ? ' अशाच श्रद्धेने त्यांचें सारें आह्निक वाढलेले होतें. २३२ रामदास तुकाराम व इतरही संतांच्या, व इतरही चांगल्या सांप्रदायांत अधिकारी माणसें निपजून त्यांचें उर्जित व्हावें, म्हणून प्रार्थना करतांना आम्ही स्वतः ऐकले आहे. व त्याप्रमाणे ते नेहमी म्हणतही ' अरे, आळंदीस महा- राजांनीं खातें घातले असे आणखीनही ठिकठिकाणी कारखाने आहेत. सर्व बाजूंनी सर्वांचेंच उर्जित झाल्याखेरीज राष्ट्राचें कल्याण कसे होईल ? तेव्हां आपल्या तपश्चर्यंचें कार्यंही आपल्याच हातून व्हावें, असा अभिमान वरून चालणारा मनुष्य कुचकामाचा. कोणालाही महाराज वर आणोत, व कोणाच्याही हातानें करून घेवोत, अशी कळकळ पाहिजे. मग त्यांत ' हैं माझ्या हातानें होऊं द्या,' असे म्हणण्यास हरकत नाहीं. इतकेच नाही, तर प्रत्येकानें झोपें- तून उठतांच जागृतीच्या पहिल्या सपाट्यासच महाराजांस 'आमच्या या भारतवर्षीय देशास आमच्या या डोळ्यांदेखत आमच्या हातांकरवी पारतंत्र्या- पासून मुक्त करा आणि वेदक धर्माचें वैभव 'याचि देही याचि डोळां ' पाहूं द्या,' असे न म्हणणें म्हणजे, आपल्या जन्मदेच्या 'खाटल्यावर ' जाण्यापेक्षां घोर पातक आहे, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितलें. परंतु आपल्या हातून होईल तरच तें ठीक असेच मनांत बाळगणे मात्र खोटें. एवढ्य़ाचकरितां जर्मनींतील व इतर पाश्चात्य राष्ट्रांतील थोर पुरुषांची ते उदाहरणें देत. असा संकुचित अभिमान त्यांनीं धरला असता तर, निराशेनें ते केव्हांच गळून गेले असते, व त्या देशांत कांहीही झाले नसते. परंतु मला यश नाहीं आलें तरी तो धागा उचलून धरून देशांतील कोणी दुसरे उद्योग करतील, परंतु अखेरीस आपले कार्य सिद्धीला जाईल, अशा निरपेक्ष उत्कटतेने त्यांनी आपली सोन्या- सारखी आयुष्य जाळली, तेव्हां कोठें राष्ट्राची मूस तयार झाली. असो. अशा रीतीनें त्यांचें आह्निक २-३ तास चाले. परंतु असे सलग ३ तास