Jump to content

पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२४ 'साक्षात्परिचय ' याचे, व तेर्णेकरून त्याचा वीयत्साह वाढवून त्याच्या ठिकाणी अकुंठित क्रिया- शक्ति चेतवावयाची, परंतु त्याच्याच बरोबर पुढील भागासंबंधानें त्यास फक्त मार्ग लावून देऊन आपण होऊन जास्त एक अवाक्षरही सांगावयाचे नाहीं, अशी त्यांची सरसहा एक तन्हा दिसते. त्यावरून प्राप्तपुरुष म्हटला म्हणजे तो एक अत्यंत आंतल्या गांठीचा आणि साऱ्या जगाच्या डोळ्यांत धूळ टाकून जाण्याचा विडा उचललेला ठकशिरोमणी असतो, अशी सर्वज्ञ समजूत झालेली दिसते; आणि 'जिन्ने पाई उन्ने छुपाई' असल्या तऱ्हेच्या कल्पना रूढ झालेल्या दिसतात. कांहीं लोक तर असे समजतात की, या पूर्ण झालेल्या लोकांच्या मूळ स्वभावांतील कोतेपणामुळे त्यांच्या ठिकाणी अनुदारपणा राहिलेला असतो ! व त्यामुळेच कित्येक महापुरुषांना सर्व साधुसंतांची चरित्रें निरुपयोगी वाटतात. परंतु थोडा विचार केला तर असे आढळून येईल की, हें पूर्वसंतांचे करणे केवळ विक्षिप्तपणाचे नसून शास्त्रसंमत आहे. त्यांच्या ठिकाणी स्वतःच्या कांहीं लौकिकमनोवृत्तीच्या शांत्यर्थ असले वर्तन संभवतच नाहीं. दया, लोक- कल्याण, वगैरेंच्या मनोवृत्ति कितीही उत्कट असल्या, तरी जगाच्या खऱ्या अंतरंगाचा यथार्थ प्रबोध असल्यामुळे, जगांत सर्व गोष्टींची 'वाउगी चाउटी' कशी होते, हे त्यांना पुरतें ठाऊक झालेले असतें; त्यामुळे त्यांचा नाइलाज होऊन ' जिन्ने पाई उन्ने छुपाई' असे त्यांना व्हावे लागतें. एरवी त्यांना तर हा आपला अंतरंग ठेवा कोणास तरी देऊन आपल्या सुखाचा भागीदार करा- वयाची इतकी अमर्याद उत्कंठा असते की, 'किंचितही सुख टाकी वो थुंकोनी, ' असे म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांनाही 'माझिये जातीचे भेटो मज कोणी । आवडीची धणी फेडावया । ' अशी प्रार्थना केल्याखेरीज राहवत नाहीं. स्वतः अण्णासाहेब असे सांगत कीं 'खरोखर अधिकारी आणि योग्य असे पात्र न मिळाल्यास हे लोक अखेरीला एकाद्या मत्स्यगंधेशी रममाण होणाऱ्या पराशराप्रमाणें अगदर्दी अप्रज्ञ शिष्यावर अनुग्रह करण्यासही तयार असतात व करितातही. ' असे असून देखील आपल्या पसंतीचा, व सत्पात्र असा साधक असूनही जेव्हां त्याला हे लोक आपल्या पुढील भागासंबंधाने म्हणण्यासारखी माहिती देत नाहीत, तेव्हां त्यांचे कांहींतरी तसेच कारण असले पाहिजे. तें कारण हॅच आहे कीं, तसे अनुभव आधी सांगितले असतां,