पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिकविणींतील धोरण. २१९ चांगले संस्कार असले, तरी ते भिन्न भिन्न परिस्थितीत टिकाव धरीत नाहीत, आणि मोठमोठ्या गुणवंताची ही पंतांच्या म्हणण्याप्रमाणे ' सदधिक्षेपों पर्व- र्तते बुद्धि ।' अशी स्थिति होते. त्यामुळे मोठेवाकटेपणाचा फारसा प्रश्न न ठेवतां, जेणे करून अभिजात संस्कार रूढ होतील, अशी सर्व तऱ्हेची उप- युक्त माहितो, काम पडल्यास अगदीं उघड शब्दांत देखील ते देत. अश्लील- पणाचा एका प्रकारचा मोठा बाऊ करून, भाषेच्या सोवळेपणाचें वंड माजवि- ल्यानें फायदा न होतां उलट त्या शब्दांनी ग्राम्य विषयाची सूचना मिळण्याची मनास संवय लागते. याच्या उलट, बोलण्या चालण्यांतल्या साधारण मर्यादा पाळून त्या शब्दांची फारशी प्रतिष्ठा न ठेवल्यास ते शब्द तोडांत खेळूनही, दांत पाडलेल्या सापाप्रमाणे मनास दंश करूं शकत नाहींत. याचा अर्थ असा नाहीं की नित्य निरंकुश शिमगाच करावा. त्यांच्या कित्येक वेळच्या भाषेचें व उघड बोलण्याचें कांही लोकांना जें चमत्कारिक वाटे, त्याचे धोरण या. वरून समजावयाचें. एकदां शिमग्यांतील पोरांच्या शब्दोच्चारावद्दल असाच प्रश्न निघाला , वास्तविक पाहिले तर असला वादग्रस्त विषय ब्रह्मर्षि श्रीअण्णासाहेब यांच्या चरित्रांत येण्याचेंही कांहीं कारण नाही. कारण त्यांचा अर्थाअर्थी कांही संबंध नाहीं. कांही तरी उदाहरण द्यावयाचें होतें. हैं एक आठवलें. हें दिलें इतकेंच; तरी पण हेही एक प्रकारें ठीकच झाले. या निमित्तानें इतिहासपकडून माझें समाधान होईल व त्यामुळे त्या संबंध प्रस्तावनेवरील माझ्या ' संस्था ' शब्दाचा उपयोग 'सर्वावयवव्यापक वस्तु असा कोटें केलेला आहे ? 'मंगलानां शतं दर्शनात् स्पर्शनात् कीर्तनात् चाशुभा- नि व्यपोह्य अर्थसिद्धि दिशत्युत्तमां ॥ इति विश्वनाथभभणितं प्रातःस्मरणं आकर्ण्य उदतिष्ठत् ' यावरून शाहजीच्या दिनचर्येचें मनोहर काव्य कसें उत्पन्न होतें ? ' आपल्याला ईश्वरी साक्षात्कार होतो अशी शिवाजी महारा- जांची खरोखर श्रद्धा नसून ती एक सोईची भाषा उर्फ थोतांड होतें ही माहिती त्यांना कोणत्या अॅबटनें दिली अथवा कोणच्या शिवानें हा साक्षात्कार दिला ' ? वगैरे अनेक शंका त्यांच्या पुढे मांडावयाचा मला धीर येईल. लेखक.