पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ सुधारण्याचे त्यांनी काय प्रयत्न केले, आणि त्यामुळे जागे झालेले हिंदु, आणि त फुगलेले अँग्लो इंडियन अधिकारी यांची एक प्रकारची अशस्त्र लढाई कायमचीच कशी लागून राहिली, हें अण्णासाहेबांच्या आयुष्याचे मूळ विषय होत. अशा रीतीनें हें चरित्र म्हणजे सुमारें अर्ध्या शतकांतील महाराष्ट्राचा एक लॉकेट साइझ फोटोच होय. अशा प्रकारच्या चित्रांना जशा तऱ्हेचा परभाग ( Back ground ) हवा असतो, तशाच प्रकारचें हुबेहुब भाऊसाहेब व त्यांच्या पत्नी साध्वी जानकीबाई, यांचें जोडपें होतें. भाऊसाहेब यांचें शरीर धिप्पाड, भाषण व वागणूक रुबाबदार, स्वभाव विलासी परंतु अत्यंत मानी, बाणेदार, करारी, आणि उदार, आणि राहणी पिढीजाद सरदारास साजेशी खर्चीक, थाटामाटाची व ऐटदार असे; तर जानकीबाईंचा स्वभाव त्याहीपेक्षां विलक्षण करारी व अभिमानी, पण तपस्वी आणि श्रद्धाळु असा होता. श्री- अण्णासाहेब यांचे ठिकाणीं जो जुन्याविषयींचा कमालीचा अभिमान, व आमच्या पूर्वपरंपरांविषयीं उत्कट प्रेम दिसून येई, तें उगीच नव्हतें. आनुवं- शिकतेमुळेच त्यांना त्या आवडत, असे नाही, त्यांनी त्यांचे उत्कृष्ट नमुनेही पाहिले होते, व त्यामुळे त्यांच्या हृद्गतासह या गोष्टी त्यांच्या ठिकाणी उत रल्या होत्या. “ मातृजं चास्य हृदयं " म्हणून म्हटले आहे, तें कांहीं खोटें नाहीं. त्यांची आई अत्यंत श्रद्धाळू, परम भक्तिमती, मोठी तपस्विनी, आणि साक्षात्कारी होती, त्यामुळे वैदिक धर्माचे मंगल ध्येय, त्या ध्येयाची प्राप्ती सुलभ रीतीनें करून देणारे शेंकडों मार्ग, आणि कोणच्या ना कोणाच्या तरी रीतीनें, त्यांत अनायासें मिळून जाईल अशा रीतीनें ठरवून दिलेलें, आमचें पवित्र, विश्वमंगल, आणि धीरोदात्त असें चारित्र्य, आणि या सर्वांचा सर्वांग- परिपोष करून, जीवाला त्या परमध्येयाकडे सहज नेणाऱ्या अशा, पोटभरू लोकांच्या पचनीं न पडणाऱ्या अनेक गूढ, साध्यासुध्या परंपरा याविषयीचे ज्ञान त्यांच्या ठिकाणी उपजतच होतें. या सर्व तंतूंनींच त्यांच्या हृदयाची रचना झाली होती. त्याचप्रमाणे श्रेष्ठ बुद्धिमत्ता, थोर स्वभाव आणि औदार्य, जातिवंत स्वदेशप्रीति, हाडाच्या ब्राह्मणास साजेल असली निर्भयता, आणि बाल्य.

  • आभाति लब्धपरभागतयाधरोष्ठे । लीलास्मितं सदशनार्चिरिवत्वदीयं ॥

-कालिदास.