पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज्योतिषशास्त्राची अपूर्णता. १९५ उपयोग होतो,तरीपण भगवत्कृपेनें नियतीच्या प्रवाहांत उलट पाहत असलेले क्वचित् जीव आढळतात, त्यांच्यासंबंधीं हैं शास्त्र आमच्या कल्पनेप्रमाणे तंतोतंत जुळणार नाहीं. ” आणि ज्योतिषशास्त्राचा ज्यांनीं खरोखर अभ्यास केला आहे, अशा विद्वानास सर्व शास्त्राभिमान टाकून शेवटी एक गोष्ट कबूल करावीच लागते. प्रत्येक जीव म्हणजे हरतऱ्हेचें कर्म निर्माण करण्याचा कारखानाच आहे. या टांकसाळीत सर्व प्रकारची नाणीं अखंड पडतच असतात, व विश्वांतून सुखदुः- खात्मक भोगरूपी कच्चा माल त्याला अखंड पुरविला जाऊन त्याची उत्पादक शक्ति अखंडित राहते. अशा स्थितीत अमुक प्रकारचें नाणें या टांकसाळीत तयार होईल एवढेंच फार झाले तर कोणीही सांगूं शकेल; परंतु पुढे त्या नाण्याची दुनियेच्या बाजारांत कशी किंमत ठरेल, आणि त्याच्या मोबदल्यांत तो काय परत घेऊन येईल, हे सांगणे कठीण आहे. कारण तें एका विषयाचे काम नसून दुनियेच्या बहुविध व्यवहारांच्या ज्ञानावर अवलंबून आहे. म्हणजे, एका कुंडलीच्या मानानें त्या जीवास सुखदुःखात्मक भोग श्वांतून किती मिळावयाचा आहे, हें ज्योतिषी सांगू शकेल; परंतु तो तेवढा भोग मिळाव- यास, केवढ्या प्रमाणाचें कर्म त्याच्या हातून घडावें लागेल, हे सांगणे ज्योतिष या जडशास्त्राच्या पलीकडे आहे. उदाहरणार्थः- एकाद्याला द्रव्यप्राप्तीचा आनंद द्यावयाचा आहे. अशा वेळीं असे होईल, की त्या व्यक्तीला अनुसरून अथवा त्या व्यक्तीच्या विशिष्ट परिस्थितीला अनुसरून वेळेस एक पैसा दिला असतांही त्याला मोठी धन्यता वाटेल, व हातीं चिंतामणी आल्यासारखें होऊन जाईल; अथवा, एक लाख रुपये देऊन देखील त्याचा संतोष न होतां उलट खेद व निराशा वाढतील, अशा वेळीं दिलेले दान व तें घेणाऱ्याची संतुष्टी यांचें ज्याला प्रमाण ठाऊक असेल, तोच त्याची बरोबर सांगड घालू शकेल, अथवा, व्यवहारांतील सोपा दृष्टांत द्यावयाचा म्हणजे, एकाद्या शेतकऱ्यापुढे जर आंब्याच्या चार कोयी नेऊन ठेवल्या तर तो चटकन् असे सांगेल कीं, या कोयींपासून अमुकअमुक प्रकारचा वृक्ष निर्माण होईल, त्याला अमुक तऱ्हेचीं फळे येतील, साधारण अमुक काळ फळे यावयास लागेल, त्याची पाने अशीं असतील, फुले तशी असतील इ० इ० आणि तें सर्व जरी खरें झालें; म्हणजे वृक्षफुलफलांची जाति जरी तीच ठरली तरी देखील तो वृक्ष कां ४० फूट उंच होईल, कां २५ फूट वाहूनच त्याची वाढ खुंटून जाईल, त्याचें फळ निंबासारखें लहान होईल, कां पपनसासारखे