पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२ पुढील आयुष्य. बास नेण्याचीहि सवड नव्हती. त्यामुळे सौ० मथुबाई या माहेरींच असत व काम संपून अगर रजा घेऊन परत आले म्हणजे जांवईहि तेथेंच रहात. त्यामुळे श्री० अण्णासाहेब यांस कन्येचा वियोग असा कधीहि झाला नाही. स्त्रीजातीत देखील विरळाच आढळणाऱ्या सद्गुणांच्या योगानें सौ• मथुताई दिवशीं लेव्ही असून लेव्हीला आपल्याला आमंत्रण आहे, व तेवढ्याकरितां • नवा पोलका करावयास टाकला आहे,' वगैरे हकीगत मालकिणीकडून त्या बाईस कळली. लेव्ही हें काय प्रकरण आहे, व तें कशाशी खातात याची बाईस कांहींच कल्पना नव्हती. लेव्ही हा शब्दही विचारीनें पूर्वी कधीं ऐकला नव्हता. परंतु स्त्रीजातीला अनुसरून आपल्या ' इथल्या' मोठेपणाचा मी तिला मोठा अभिमान असल्यामुळे ही कांहीतरी मोठी मानाची बाब आहे, तेव्हां आपल्या येथे आमंत्रण असलेच पाहिजे, व ज्याअर्थी मुदलियारीण बाई जाणार, त्याअर्थी आपणही तिच्याबरोबर तेवढ्या ऐटीनें गेलें पाहिजे, असा तर्क करून, तिनें ठांसून सांगितलें कीं "आमच्या 'इथल्यां'ना पण आमंत्रण आहे, व आम्हीही जाणार आहों. त्यावर 'कशा तऱ्हेनें जावयाचें' वगैरे खल होऊन दोघींचेही बरोबरच जाण्याचे ठरले. घरी आल्यावर तिनें यजमानास मोठ्या आनं- दाने सांगितलें कीं 'परवां लेव्हीला मुदलियारीणबाईचें व आमचें बरो- बरच जावयाचे ठरले आहे. ' तेव्हां त्याला नवल वाटून तो म्हणाला ‘ कुठली लेव्ही ? आणि कसले आमंत्रण घेऊन बसलीस ? आपल्याला कोटून लेव्हीला आमंत्रण येणार ?' लेव्हीस नवऱ्याला आमंत्रण नाहीं हैं ऐकून त्या बाईस खरेंही वाटेना. ती म्हणाली, " उगीच कांही तरी सांगायचे झालें. नेहमीं तर सांगायचें कीं, 'आपले लोकांत असे वजन आहे, अमूक साहेबानें आपल्याला असे भेटावयास बोलाविलें होतें. ' आणि एवढी मोठी लेव्ही गांवांत असून आमंत्रण नाहीं म्हणतां ? कांही तरीच, झालें. " पुन्हा शपथपूर्वक सांगून गृहस्थानें तिची खात्री करून दिली कीं, ‘ लेव्ही हें एक बजे प्रकरण असून तिला आमंत्रण व्हावें, अर्से सरकारांत आपले कांहीही वजन नाहीं. ' तेव्हां तिने सांमितलें ' तें तुमचें कांहीही असो लेव्हीला तर आपल्याला गेलेच पाहिजे. आम्हांला आमंत्रण आहे, म्हणून मी बाईंना सांगितले आहे, आणि आतां आमंत्रण नाही, म्हणून मी येत नाहीं, त्यावर पुन्हा